दुर्लक्ष करू नका ! छातीत दुखणे फक्त एवढेच नाही तर हार्ट अटॅकची 'ही ' लक्षणे देखील जाणून घ्या
दुर्लक्ष करू नका ! छातीत दुखणे फक्त एवढेच नाही तर हार्ट अटॅकची 'ही ' लक्षणे देखील जाणून घ्या
img
वैष्णवी सांगळे
हार्ट अटॅकचं लक्षण म्हटलं की, छातीत दुखणं हेच अनेकांना माहिती आहे. मात्र या व्यतिरीक्त देखील हार्ट अटॅकची लक्षणं दिसून येतात. आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत हृदयविकाराचा झटका ही एक मोठी समस्या आहे. अनेक वेळा हा अटॅक अचानक येतो आणि रुग्णाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याइतकाही वेळ मिळत नाही. यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. पण जर शरीर आधीच काही लक्षणं देत असेल आणि आपण ती वेळेत ओळखली, तर उपचार घेऊन जीव वाचवता येऊ शकतो. त्यामुळे हार्ट अटॅकची लक्षणं ओळखणं अत्यंत गरजेचं आहे. 

जबड्यांमध्ये वेदना
हार्ट अटॅकचं हे कमी ज्ञात असलेलं पण महत्त्वाचं लक्षण आहे. जर छातीतून दुखणं होत असताना ते दुखणं जबड्यांपर्यंत पोहोचत असेल आणि त्यासोबत इतर वरील लक्षणं देखील असतील, तर हे हार्ट अटॅकचं स्पष्ट संकेत असू शकतं.

उल्टी किंवा मळमळ
हार्ट अटॅकच्या रुग्णांमध्ये मळमळ किंवा उलटी होण्याची भावना सामान्यपणे दिसून येते. काहींना पोट खराब झाल्यासारखं वाटू शकतं किंवा थेट उल्टी होते. हे लक्षण इतर लक्षणांबरोबर आढळल्यास ते गंभीर मानलं जातं.

हे ही वाचा... 
धक्कादायक ! IB अधिकारी अन् त्याच्या बहिणीनं विष पिऊन संपवलं आयुष्य

थकवा
ही एक अत्यंत सामान्य आणि लक्षणीय लक्षण आहे. विशेषतः महिलांमध्ये हार्ट अटॅकच्या अगोदर थकवा जाणवतो. अगदी किरकोळ कामं केल्यावरही जास्त थकवा जाणवत असेल तर त्याकडे दुर्लक्षित करू नका. 

हृदयाचे ठोके अनियमित होणे
हृदयाचे ठोके खूप जलद झाले असतील किंवा अनियमित वाटत असतील तर तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या. ही स्थिती हार्ट अटॅकच्या सुरुवातीचं संकेत असू शकते. अशावेळी डॉक्टरांचं म्हणणं नेहमी ऐकावं.

इतर भागांमध्ये वेदना
हार्ट अटॅक म्हणजे फक्त छातीत दुखणं असं नाही. छातीतून सुरू झालेलं दुखणं डाव्या हातापर्यंत, मान, पाठ किंवा पोटापर्यंत पसरू शकतं. अशा प्रकारच्या वेदना पसरत असतील तर ते देखील हार्ट अटॅकचं लक्षण असू शकतं.
इतर बातम्या
Join Whatsapp Group