३० वर्षीय बँक कर्मचाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू ... कुठे घडली ही घटना ?
३० वर्षीय बँक कर्मचाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू ... कुठे घडली ही घटना ?
img
Jayshri Rajesh
बँकेत लॅपटॉपवर काम करत असताना बसल्या जागेवरच एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बँकेत लावण्यात आलेल्या सीसीसीटीव्हीत मृत्यूची ही घटना कैद झालीय. प्राथमिक तपासणीत हार्टअटॅकमुळे त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जातेय.

बँकेत लॅपटॉपवर काम करत खुर्चीवर बसलेला एक कर्मचारी जागेवरच बेशुद्ध पडला आणि अवघ्या काही सेकंदातच त्याला मृत्यूने गाठलं. मृत्यूची ही घटना बँकेत लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे. प्राथमिक तपासणीत हार्टअटॅकमुळे या बँक कर्मचाऱ्याच्या मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जातेय. उत्तर प्रदेशमधल्या महोबा जिल्ह्यातील एका खासगी बँकेतील ही घटना आहे. बँक कर्मचाऱ्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

 नेमकी घटना काय ?

ही घटना 19 जुलैची आहे. महोबातल्या कबरई भागात एका खासगी बँकेच्या शाखेत नेहमीप्रमाणे कर्मचारी आपलं काम करण्यात व्यस्त होते. त्यावेळी लॅपटॉपवर काम करणारा राजेश शिंदे (वय 30) हा बँक कर्मचारी खुर्चीवर बसल्या-बसल्या बेशुद्ध झाला. बाजूला बसलेल्या सहकर्मचाऱ्याला बराच वेळ ही गोष्ट माहित नव्हती. काही वेळाने त्याने मागे वळून पाहिलं असता राजेश शिंदेने खुर्चीवर मान टाकलेली त्याने पाहिलं. त्याने मदतीसाठी बँकेतील इतर कर्मचाऱ्यांना बोलावलं.

एका कर्मचाऱ्याने राजेश शिंदेला प्राथमिक उपचार देण्याचा प्रयत्न केला. पण यानंतरही त्याच्या तब्येतीत सुधारणा जाणवली नाही. त्यामुळे राजेशला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपचाराआधीच राजेशचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या घटनेने बँकेतील इतर कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.

काही मिनिटांपूर्वी आपल्याशी बोलणारा राजेशच्या अचानक मृत्यूने कर्मचाऱ्यांबरोबरच त्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. राजेश शिंदे हा मोहाबा जिल्ह्यातल्या बिवांर गावचा रहिवासी होता.
इतर बातम्या
Join Whatsapp Group