बांगलादेशचा माजी कर्णधार तमीम इकबाल याला हार्ट अटॅकचा झटका आल्याचे समोर आले आहे. क्रिकेट खेळत असतानाच त्याला अचानक छातीत दुखू लागले. त्यानंतर तमीमला रूग्णालयात दाखल करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार , तमीमची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जातेय. फिल्डिंग करत असताना तमीमच्या छातीत दुखू लागले, त्यानंतर सपोर्ट स्टाफ तातडीने आले. प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले.
ढाका प्रीमियर लीग मध्ये तमीम इकबाल मोहम्मदन स्पोर्टिंग क्लबसाठी खेळत होता. शिनेपुकुर क्रिकेट क्लब आणि मोहम्मदन स्पोर्टिंग क्लब यांच्यादरम्यान सामना सुरू होता. त्यावेळी फिल्डिंग करत असताना तमीमच्या अचानक छातीत दुखू लागले. त्यानंतर उपचारासाठी त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
एका वृत्त संस्थेने दिलेल्या वृत्तानुसार , तमीम इकबाल फील्डिंग करत होता, त्यावेळी त्याला अचानक त्रास होऊ लागला. त्यानंतर त्याला फजिलाट्यूनेशा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तमीम याचा कोणताही मेडिकल रिपोर्ट अद्याप समोर आलेला नाही, पण त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे बोलले जातेय. बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे फीजिशियन डॉ. देबाशीष चौधरी यांनी तमीमला आलेल्या हार्ट अटॅकच्या घटनेला दुजोरा दिला आहे.
फिल्डिंग करताना तमीमच्या छातीत अचानक दुखू लागले. त्याला रुग्णालयात दाखल करण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर करण्यात आला. ५० षटकाच्या सामन्यात फिल्डिंग करताना तमीम याने छातीत दुखत असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर तात्काळ मेडिकल एक्सपर्ट्सने प्राथमिक उपचार केले.
तमीमचा करिअर -
तमीम इकबाल याने बांगलादेश क्रिकेट संघाचे नेतृत्व केलेय. त्याने बागलादेशसाठी ७० कसोटी, २४३ वनडे आणि ७८ टी२० सामने खेळले आहेत. कसोटीत तमीमच्या नावावर ५१३४ धावा आहेत. तर वनडेमध्ये दहा शतकासह ८३५७ धावा केल्या आहेत. टी२०मध्ये त्याने १७५८ धावांचा पाऊस पाडला आहे. टी२० मध्ये तमीमने एक शतक ठोकले आहेत.तर कसोटीमध्ये तमीमच्या नावावर १४ शतके आहेत.