नाशिकमध्ये एक खळबळजनक आणि तितकीच हृदयद्रावक घटना घडली आहे. एका सहावीत शिकणाऱ्या मुलीचा हॉर्ट अटॅकने मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
शहरातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकणाऱ्या या चिमुकलीला शाळेच्या गेटमधून आत प्रवेश करत असताना अचानक चक्कर आल्याने ती खाली कोसळली. शिक्षकांच्या ही बाब लक्षात येताच तिला तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
मात्र रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थिनीला आधीपासूनच हृदयाचा त्रास होता.
या घटनेनंतर नाशिकमध्ये आणि शाळेत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेने हार्ट अटॅकने होणाऱ्या मृत्यूची चिंताजनक बाब पुन्हा एकदा समोर आली आहे.