मोठी दुर्घटना : ६५ फूट उंच स्टेज कोसळले ; ७ जणांचा मृत्यू तर ८० जण जखमी , नेमकं काय घडलं?
मोठी दुर्घटना : ६५ फूट उंच स्टेज कोसळले ; ७ जणांचा मृत्यू तर ८० जण जखमी , नेमकं काय घडलं?
img
Dipali Ghadwaje
उत्तर प्रदेशातील बागपतमध्ये मंगळवारी जैन समुदायाच्या निर्वाण महोत्सवादरम्यान एक दुर्घटना झाली. येथे ६५ फूट उंच प्लॅटफॉर्मच्या पायऱ्या तुटल्या. यामुळे अनेक भाविक एकमेकांवर कोसळू लागले. चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली. या दुर्घटनेत ६ भाविकांचा मृत्यू झाला आहे. ८० हून अधिक जण जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार,गंभीर जखमींना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्थानिक लोक रक्ताने माखलेल्या भाविकांना हातगाड्यांवरून रुग्णालयात घेऊन जात आहेत.

उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील बरौत शहरात मंगळवारी  सकाळी  हा  दुर्दैवी अपघात घडला. भगवान आदिनाथांच्या निर्वाण लाडू उत्सवादरम्यान मान स्तंभ संकुलात लाकडी स्टेज कोसळला अन् या अपघातात सात भाविकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन महिला आणि पाच पुरुषांचा समावेश आहे. तर ८० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. 

अपघातानंतर घटनास्थळी लगेचच चेंगराचेंगरी झाली. तसेच, चेंगराचेंगरी नियंत्रित करण्याचा प्रयत्न करणारे ५ पोलिसही जखमी झाले.

भगवान आदिनाथांच्या निर्वाण लाडू उत्सवानिमित्त मंगळवारी सकाळी बरौत येथील श्री दिगंबर जैन पदवी महाविद्यालयाच्या परिसरात ६५ फूट उंच स्टेज कोसळल्याने सात भाविकांचा मृत्यू झाला आणि सुमारे ७५ जण जखमी झाले.

ही घटना 28 जानेवारीला सकाळी ८ वाजता, श्री १००८ आदिनाथ भक्तांबर प्रचाराच्या वतीने मोक्ष कल्याणक निर्वाण महोत्सवाअंतर्गत भगवान आदिनाथांच्या अभिषेकासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तिथे भाविकांची गर्दी जमली होती. मानस्तंभ संकुलात बांधलेल्या तात्पुरत्या स्टेजच्या लाकडी पायऱ्या तुटल्या आणि स्टेज कोसळला, ज्यामुळे सुमारे ८० भाविक जखमी झाले.

बरौत शहर कोतवाली परिसरातील गांधी रोडवर हा दुर्दैवी अपघात घडला. जखमींना तातडीने रुग्णालयात नेण्यात येत आहे. डीएम अस्मिता लाल आणि एसपी अर्पित विजयवर्गीय रुग्णालयांमध्ये पोहोचून जखमींची माहिती गोळा करत आहेत. बचावकार्य सुरू असून घटनास्थळी वरिष्ठ पोलिस आणि प्रशासनाचे अधिकारी उपस्थित आहेत.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group