संतापजनक ! सोनं, जमीन त्याला पुरली नाही, जुगारात त्यानं बायकोही पणाला लावली
संतापजनक ! सोनं, जमीन त्याला पुरली नाही, जुगारात त्यानं बायकोही पणाला लावली
img
वैष्णवी सांगळे
जुगाराने अनेकांची कुटुंबे उध्वस्त झाली. या जुगारात कोण काय पणाला लावेल काही सांगता येत नाही. घर, गाडी, जमीन आणि बुद्धी पूर्णच भ्रष्ट झाली असेल तर बायको आणि मुलंही हे लोक पणाला लावतील. उत्तर प्रदेशमधून अशीच एक खळबळजनक आणि तितकीच संतापजनक बातमी समोर आली आहे. येथील एका महाभागाने चक्क त्याची बायकोच जुगारात पणाला लावली. 

पीडितेच्या पतीला जुगाराची सवय आहे. त्याने जुगारासाठी बायकोचे दागिनेही विकले, जमीन गमावली. पण इतके गमावल्यानंतर त्याचे जुगारचे व्यसन काही कमी झाले नाही. घरातील भांडीकुंडी विकल्यावर ही त्याचे मन भरले नाही. आणि त्यांनतर त्याने थेट बायकोलाच पणाला लावले. शेवटी बायकोने वैतागून उत्तर प्रदेशातील रामपूर भागातील रामपूर जिल्हा पोलीस अधीक्षकांचे कार्यालय गाठले. त्यानंतर पोलिसांनी या जुगारी पतीविरोधात गुन्हा दाखल केला. 

हे ही वाचा... 
भयंकर ! इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून महिलेची आत्महत्या, सुसाईडनोट मधील कारण ऐकून तुम्हालाही धक्का बसेल

2013 मध्ये पीडितेचे आरोपीसोबत लग्न झाले होते. हुंड्यासाठी पतीकडून तिचा छळ करत होता. एक जमिनीचा तुकडा होता. त्यावर या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू होता. पतीला दारुचेच नाही तर जुगारेचेही व्यसन होते. या जुगारापायी त्याने त्याच्या संसाराची राखरांगोळी केली. पोलीस पतीला समज देण्यासाठी दोनदा घरी आले. पण त्यावेळी पती पळून गेला. 

हे ही वाचा... 
माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; वयाच्या 81 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!

त्यानंतर पतीने पत्नीला बेदम मारहाण केली. तिचे बोट मोडले. तिचे कपडे फाडले. तिला जुगारात पणाला लावल्याने नवऱ्याचे मित्र पण घरी आले होते. त्यांनी तिला त्रास दिला.पतीला आणि त्याच्या मित्रांना चांगला धडा शिकवावा अशी मागणी या पत्नीने केली आहे. मुलांच्या भविष्यासाठी आता पतीपासून आपली सुटका करावी अशी मागणी तिने केली. आता आपण कोर्टात सर्व काही सांगणार असल्याचे ती म्हणाली. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group