उत्तर प्रदेशच्या झाशीमध्ये मध्यरात्री रुग्णालयात होरपळून दहा नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज सकाळी उत्तर प्रदेशच्या बिझनौरमध्ये अपघातामध्ये एकचा कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातामध्ये नवविवाहित दाम्पत्याचा समावेश आहे. लग्न करुन निघालेल्या नवरा-नवरीला मृत्यूने गाठले. उत्तर प्रदेशसाठी शनिवारचा दिवस घातवार ठरला आहे. उत्तर प्रदेशमधील बिझनौरमध्ये हरिद्वार-काशीपूर राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला. हुंडई क्रेटा कारने एका ऑटोला जोरदार धडक दिली. पहाटेच्या धुक्यामुळे कार चालकाला अंदाज आला नाही, त्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या अपघातामध्ये सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. ऑटो चालकाचे उपचारावेळी निधन झाले. मृतामध्ये नवविवाहित पती-पत्नींचा समावेश आहे.
मृतकांमध्ये 4 पुरुष, 2 महिला आणि एका मुलीचा समावेश आहे. मृतामध्ये 65 वर्षीय खुर्शीद, त्यांचा मुलगा विशाल (25 वर्ष), पुत्रवधू खुशी (22 वर्ष), पत्नी मुमताज (45 वर्ष), मुलगी रूबी (32 वर्ष) आणि 10 वर्षीय बुशरा यांचा समावेश आहे.
कसा घडला अपघातात?
एका वृत्त संस्थेने दिलेल्या वृत्तानुसार शनिवारी सकाळी अपघाताची माहिती मिळाली. क्रेटा कार दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करत असताना अचानक लेन बदलली गेली आणि भरधाव वेगात असलेल्या ऑटोला धडकली. त्यात धुके असल्यामुळे कार चालकाला अंदाज आला नाही.ऑटोमध्ये 7 लोक होते, त्यापैकी 6 जणांचा जागीच मृत्यू झाला. सध्या सर्वांचे पोस्टमॉर्टम करण्यात येत आहे .