संतापजनक : 'या' ठिकाणी दूध विक्रेत्याचं किळसवाणं कृत्य  आलं  समोर ; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
संतापजनक : 'या' ठिकाणी दूध विक्रेत्याचं किळसवाणं कृत्य आलं समोर ; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
img
DB
भेसळयुक्त अन्न, फळभाज्या हा फारच गंभीर मुद्दा होऊन बसला आहे. भेसळयुक्त अन्न, रसयनांचा वापर करून वाढवण्यात आलेल्या फळभाज्यांमुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळते. विशेष म्हणजे काही विक्रेते नाल्यातील पाण्यात भाजी-पाला साफ करताना दिसतात. तसे काही व्हिडीओही समोर आलेले आहेत. असे असतानाच आता धक्कादायक असा व्हिडीओ समोर आला आहे.

या व्हिडीओत एक दूध विक्रेता चक्क दुधात थुंकताना दिसतोय. हा व्हिडीओ पाहून सगळीकडे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

नेमके प्रकरण काय?

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक दूध विक्रेता चक्क दुधात थुंकताना दिसतोय. मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ उत्तर प्रदेशमधील लखनौ येथील आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या व्हिडीओनुसार एक दूधवाला एका घरी दूध देण्याआधी त्यात थुंकताना दिसतोय. दुधामध्ये थुंकल्यानंतर त्याने ते घरातील व्यक्तीला देऊ केले आहे.

 
दूध विक्रेत्या पप्पूला ठोकल्या बेड्या

लखनौ येथील गोमती नगरातील हा व्हिडीओ असून सीसीटीव्ही पाहिल्यानंतर घरामालकाने थेट पोलिसात तक्रार केली आहे. केलेल्या तक्रारीनुसार दुधात थुंकणाऱ्या दूधवाल्याचे नाव मोहम्मद शरीफ उर्फ पप्पू आहे. याबाबतची तक्रार दाखल झाल्यानंतर पप्पू याला अटक करण्यात आली असून त्याची चौकशी केली जात आहे.
 


 
इतर बातम्या
Join Whatsapp Group