धक्कादायक : जिममध्ये व्यायाम करताना पोलीस अधिकाऱ्याचा हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू
धक्कादायक : जिममध्ये व्यायाम करताना पोलीस अधिकाऱ्याचा हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू
img
Dipali Ghadwaje
मुंबई : हल्ली हृदयविकाराच्या घटना झपाट्याने वाढत आहेत. ही एक गंभीर समस्या बनत चालली आहे कारण आता हृदयविकाराचा झटका फक्त वृद्धांपुरता मर्यादित नाही तर तरुणही त्याला बळी पडू लागले आहेत. हरियाणाच्या चंदीगडमध्ये जिममध्ये व्यायाम करत असताना एका पोलीस अधिकाऱ्याचा हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे . 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दिलप्रीतसिंग (वय 50) असं मृत पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे. दिलप्रीत हे पंजाब पोलीस दलातील डीजीपी पदावर कार्यरत होते. त्यांच्या निधनाने मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. 

डीएसपी दिलप्रीत सिंग पंजाबच्या मालेरकोटला येथील पोलीस ठाण्यात कार्यरत होते. मात्र, शेतकरी आंदोलनामुळे सध्या त्यांची ड्युटी खनौरी सीमेवर होती. गुरुवारी (२२ फेब्रुवारी) रात्री ८ ते शुक्रवारी पहाटे ४ वाजेपर्यंत त्यांनी ड्युटी केली.  

दरम्यान, शिफ्ट संपल्यानंतर दिलपीत सिंग हे लुधियाना-फिरोजपूर रोडवरील भाई बाला चौकाजवळ असलेल्या एका जिममध्ये व्यायाम करण्यासाठी गेले होते. जिममध्ये कसरत करत असताना दिलप्रीत सिंग यांच्या अचानक छातीत दुखू लागले. त्यामुळे ते काही क्षणातच ते जमिनीवर कोसळले. जिममधील कर्मचाऱ्यांनी दिलप्रीत सिंग यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना यांना तपासून मृत घोषित केले.

दिलप्रीत सिंग हे एक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी होते. याआधी त्यांनी लुधियानामध्ये पोलीस एसपी म्हणून काम केले होते.त्याच्या सहकाऱ्यांच्या माहितीनुसार, दिलप्रीत त्यांच्या तब्येतीबाबत खूपच जागरूक होते. ते दररोज नियमित जिमला जायचे. दिलप्रीत हे राष्ट्रीय स्तरावरील जलतरणपटू देखील होते. 1992 मध्ये सहाय्यक उपनिरीक्षक म्हणून ते पंजाब पोलीस दलात रुजू झाले होते. त्यांनी विविध पोलीस ठाण्यात सेवा बजावली आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group