हरियाणातून विनेश फोगाटचा दणदणीत विजय!
हरियाणातून विनेश फोगाटचा दणदणीत विजय!
img
DB
कुस्तीच्या मैदानातून राजकारणाच्या आखाड्यात उतरलेल्या महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने विधानसभा निवडणुकीत बाजी मारली आहे. काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवलेल्या विनेश फोगाटने ५७६१ मतांनी दणदणीत विजय मिळवला. तिने भारतीय जनता पक्षाचे उमेदवार योगेश बैरागीला चितपट केले.

हरियाणा विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत या विधानसभा निवडणुकीत जुलाना विधानसभेची जागा सुरुवातीपासूनच राज्यातील सर्वात चर्चेत जागांपैकी एक होती. या जागेवर काँग्रेसने कुस्तीपटू विनेश फोगट यांना तिकीट देऊन भाजपला शह देण्यासाठी मोठी खेळी केली होती. 

त्याचवेळी दलित चेहरा असलेल्या कॅप्टन योगेश बैरागी यांना भाजपने तिकीट दिले होते. या रोमहर्षक लढतीत अखेर आता विनिश फोगाटने बाजी मारली आहे. जुलाना विधानसभा मतदारसंघातून कुस्तीपटू विनेश फोगट विजयी झाल्या आहेत. मतमोजणीच्या १५ फेऱ्यांनंतर त्यांनी भाजपच्या योगेश कुमार यांचा ५ हजारांहून अधिक मतांनी पराभव केला.  
इतर बातम्या
Join Whatsapp Group