भाजपकडून मोठी कारवाई, ६९ बंडखोर सहा वर्षांसाठी निलंबित
भाजपकडून मोठी कारवाई, ६९ बंडखोर सहा वर्षांसाठी निलंबित
img
वैष्णवी सांगळे
पुण्यात राजकीय वर्तुळातून चांगलीच खळबळ उडाली आहे. पुण्यात भाजपचं कठोर पाऊल उचलत ६९ बंडखोरांवर सहा वर्षांसाठी निलंबनाची कारवाई केली आहे.  पुणे महानगरपालिका निवडणुकीत पक्षाच्याविरोधात जाऊन निवडणुका लढवल्याप्रकरणी भाजपने ही मोठी कारवाई केली आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

भाजपच्या अधिकृत उमेदवारांविरोधात अपक्ष किंवा इतर पक्षांच्या माध्यमातून निवडणूक लढवणाऱ्या कार्यकर्त्यांवर पक्षशिस्तीचा भंग केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. संबंधितांना पक्षातून सहा वर्षांसाठी दूर ठेवण्यात येणार असून, या कालावधीत त्यांना कोणतीही संघटनात्मक जबाबदारी किंवा पद दिले जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे.

भाजपमधून हकालपट्टी केलेल्या ६९ जणांची नावे
1. श्री धनंजय जाधव
2. श्री चंद्रकांत पाटे
3. सौ कादंबरी साळवी
4. श्री जितेंद्र टकले
5. श्री किशोर तरवडे
6. श्री अमोल बालवडकर
7. श्री सोमनाथ गुंड
8. सौ मानसी सोमनाथ गुंड
9. सौ अनिता तळाठी
10. सौ पल्लवी गाडगीळ
11. श्री दत्ता भगत
12. श्री विनोद मोहिते
13. श्री रमेश भंडारी
14. श्री समाधान शिंदे
15. श्री मधुकर मुसळे
16. श्री प्रकाश डोरे
17. श्री बाळासाहेब सानवडे
18. सौ मंजू वाघमारे
19. सौ प्रीती वालकर
20. श्री संदीप लोणकर
21. सौ स्मिता गायकवाड
22. श्री संतोष शिंदे
23. श्री युवराज कुञ्जेकर
24. श्री इफ्तियाज मोमीन
25. श्री अप्पणा दादावाडकर
26. श्री पुरुषोत्तम अप्पणा दादावाडकर
27. अभिजीत उपाध्ये
28. सौ छाया गवळी
29. श्री नवल कुसाळ
30. श्री समीर पठाण
31. श्री प्रणव मोरे
32. श्री योगेश सूर्यवंशी
33. सौ अर्चना योगेश सूर्यवंशी
34. सौ नलिनी मोरे
35. सौ संगिता ठोसर
36. श्री अनिल मेमाणे
37. श्री नितीन मारकड
38. श्री सतीश मारकड
39. सौ वर्षा मारकड
40. श्री रुपेश धुले
41. श्री बापू पोकळे
42. श्री किरण वाळुंज
43. श्री अमोल रायकर
44. श्री संदीप पोकळे
45. मोहिनी देवकर
46. रितेश रासकर
47. सचिन दशरथ दांगट
48. सुरेंद्र कांबळे
49. श्री संदीप जन्हाड
50. सौ सुनीता गलांडे
51. श्री किशोर वाघमारे
52. श्री विजय चौगुले
53. श्री अकबर पठाण
54. श्री राजू साखरे
55. सौ ऐश्वर्या जाधव
56. श्री जितेंद्र जगताप
57. श्री प्रविण खेडकर
58. सौ स्मिता खेडकर
59. सौ उज्वला गोडे
60. श्री बाळासाहेब घोडके
61. श्री सुरेश धनगर
62. सौ स्वाती धनगर
63. सौ सुवर्णा भरेकर
64. सौ पल्लवी केदारी
65. श्री राहुल रामे
66. श्री हरीष परदेशी
67. श्री बंडू जाधव
68. सौ नीता थोरवे
69. श्री प्रीतम नागापुरे
Pune | BJP |
इतर बातम्या
Join Whatsapp Group