मोठी बातमी : विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या ; वाचा
मोठी बातमी : विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या ; वाचा
img
Dipali Ghadwaje
राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूक जाहीर केली जाणार आहे. सध्या राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. अशातच विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. 

राज्य पोलिस दलामध्ये पोलिस उपायुक्त पदावर कार्यरत असलेल्या ८ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यासंदर्भात शासनाकडून आदेश जारी करण्यात आले आहेत. 

कोणत्या पोलिस अधिकाऱ्याची बदली कुठे? -

शिवाज पाटील, पोलिस उप आयुक्त ठाणे शहर यांची बदली पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रधतबंधक विभाग, ठाणे याठिकाणी करण्यात आली आहे.

भरत तांगाडे, अप्पर पोलिस अधीक्षक वाशिम यांची बदली अप्पर पोलिस अधीक्षक, ठाणे इथे करण्यात आली आहे.

संदीप भाजीभाकरे, पोलिस उप आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, नागपूर यांची बदली पोलिस उप आयुक्त पुणे येथे करण्यात आली आहे.

राजीव जैन, अप्पर पोलिस आयुक्त, उत्तर प्रादेशिक विभाग, मुंबई यांची बदली पोलिस उप महानिरीक्षक राज्य राखीव पोलिस बल महाराष्ट्र राज्य, मुंबई याठिकाणी करण्यात आली आहे.

अभिषेक त्रिमुखे, अप्पर पोलिस आयुक्त, सशस्त्र पोलिस दल, मुंबई यांची बदली अप्पर पोलिस आयुक्त, उत्तर प्रादेशिक विभाग, मुंबई इथे करण्यात आली आहे.

संजय लाटकर पोलिस उप आयुक्त बंदर परिमंडळ मुंबई यांची बदली पोलिस अधीक्षक सायबर, महाराष्ट्र राज्य मुंबई इथे करण्यात आली आहे.

प्रशांत कदम, पोलिस उप आयुक्त, परिमंडळ-४ मुंबई यांची बदली पोलिस अधीक्षक अनुसूचित जाती-जमाती आयोग, मुंबई इथे करण्यात आली आहे.

हेमराज राजपूत, पोलिस उप आयुक्त परिमंडळ- ६ बृहन्मुंबई यांची बदली पोलिस अधीक्षक सायबर महाराष्ट्र राज्य मुंबई या ठिाकाणी करण्यात आली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group