मन सुन्न करणारी घटना : माय-लेकाचा एकाच वेळी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
मन सुन्न करणारी घटना : माय-लेकाचा एकाच वेळी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
img
Dipali Ghadwaje
कोल्हापुरातील इचलकंरजी येथून हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. मुलाच्या मृत्यूनंतर आईचाही मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. माय-लेकाच्या अचानक मृत्यूमुळे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळलाय तर परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त होत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहरात मंगळवारी रात्री मुलगा प्रीतम तेरदाळे (३० वर्ष) आणि आई शोभा तेरदाळे (५४ वर्ष) यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने एकाच वेळी मृत्यू झाला.

पुजारी मळा परिसरातील राहणारा प्रीतम तेरदाळे हे रात्री आपल्या दारात मोबाईल बघत बसला होता.  प्रीतमच्या अचानक छातीत दुखू लागलं. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला. हेच पाहताना प्रीतमची आई शोभा यांनाही त्याचवेळी हृदयविकाराचा झटका आला. यात दोघांचाही दुर्दैव मृत्यू झाला आहे.

एकाच वेळी मुलगा आणि आईचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने पुजारी मळा परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group