धक्कादायक घटना...! स्वातंत्र्यदिनीच २ शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
धक्कादायक घटना...! स्वातंत्र्यदिनीच २ शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
img
Dipali Ghadwaje
देशात एकीकडे स्वातंत्र्यदिनाचा जल्लोष पाहायला मिळतोय, तर दुसरीकडे तरूणांनी आत्मदहनाचा प्रयत्न केल्याच्या घटना छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापुरमधून समोर आल्या आहेत. स्वातंत्र्यदिनी शेतकऱ्याचा जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना घडली. त्यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली होती. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , स्वातंत्र्यदिनी छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण कार्यक्रम संपल्यानंतर सोयगाव तालुक्यातील एका शेतकऱ्याने न्याय मिळाला नाही, म्हणून अंगावर डिझेल ओतलं होतं. त्याने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांच्या प्रसंगावधानाने मोठी जीवितहानी टळली.

तसेच सोयगाव तालुक्यातील घोरपड येथील शिवारामध्ये महावितरणाच्या चुकीमुळे शॉर्टसर्किट झाल्याने शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं होतं. महावितरण कार्यालयाच्या चुकीमुळे हे नुकसान झालं होतं. त्यामुळे त्याने महावितरणाकडे नुकसान भरपाई द्यावी, ही मागणी केलेली होती. मात्र एमएसईबीने हात वर करत जबाबदारी झटकली.

त्यामुळे व्यथित झालेल्या आदित्य श्रावण गायकवाड या शेतकऱ्याने जिल्हाधिकारी कार्यालय येथे न्याय मिळावा, अशी मागणी केलेली होती. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कोणताच प्रतिसाद दिला नाही.  त्यामुळे सदर शेतकऱ्याने स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयात अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, वेळीच पोलिसांनी धाव घेत शेतकऱ्यांला ताब्यात घेतल्याने मोठी जीवितहानी टळली.

कोल्हापूरमधील धक्कादायक घटना 

तर दुसरीकडे स्वातंत्र्यदिनीच कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये तरूणाने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना समोर आलीय. हातकणंगले तालुक्यातील भादोले गावात पाणीपुरवठा संस्थेसाठी उभारण्यात आलेल्या सोलार पॅनलची चौकशी करण्याची मागणी या तरूणाने  केलीय. यामध्ये सरपंच आणि ग्रामसेवक यांनी भ्रष्टाचार केलाय, असा आरोप या तरूणाने केलाय. त्याचं नाव कृष्णात भीमराव पाटील असं आहे. अंगावर रॉकेल ओतून घेत त्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. परंतु, पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने दुर्घटना टळली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group