महाराष्ट्राला ३ राष्ट्रपती पदक , तर १७ शौर्य पदक जाहीर....
महाराष्ट्राला ३ राष्ट्रपती पदक , तर १७ शौर्य पदक जाहीर....
img
Dipali Ghadwaje
भारत देश उद्या 77 वा स्वातंत्र्य दिवस साजरा करत आहे. स्वातंत्र्य दिवसच्या पार्श्वभूमीवर पोलीस पदकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. विशिष्ट सेवेसाठी महाराष्ट्राला ३ राष्ट्रपती पदक देण्यात येणार आहेत.

आयपीएस चिरंजीवी प्रसाद, राजेंद्र दहाले आणि एसीपी सतीश गोवेकर यांचा विशेषसेवेसाठी सन्मान करण्यात येणार आहे. तसंच महाराष्ट्राला १७ गॅलेंट्री मेडेल आणि गुणवत्तापूर्ण सेवेसाठी ३९ पदक जाहीर झाली आहे. उद्या स्वातंत्र्यदिनी राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

गॅलेंट्री मेडेल म्हणजेच शौर्य पदक असाधारण धैर्य आणि शौर्यासाठी व्यक्तींना दिला जाणारा एक प्रतिष्ठित सन्मान आहे. कठीण आणि धोक्याच्यावेळी असामान्य वीरता दाखवणाऱ्या व्यक्तींना राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित केलं जातं.

महाराष्ट्रातील पोलीस सेवेतील अतुलनीय कार्यासाठी राष्ट्रपती पदक : 

चिरंजीव रामचबिला प्रसाद, अतिरिक्त पोलिस महासंचालक

राजेंद्र बालाजीराव दहाळे, संचालक

सतीश रघुवीर गोवेकर, सहायक आयुक्त

  • अग्निशमन दल

संतोष वारीक, मुख्य अग्निशमन अधिकारी, महाराष्ट्र

  • कारावास सेवा

शोक ओलंबा, हवालदार 

महाराष्ट्र पोलीस सेवेतील शौर्यतेसाठी राष्ट्रपती पदक  :

कुणाल शंकर सोनवणे, उपविभागीय पोलीस अधिकारी 

दीपक आवटे, पोलीस उपनिरीक्षक 

कै. धनाजी होनमाने, पोलीस उपनिरीक्षक (मरणोपरांत) 

नागेश कुमार एम. (नायक पोलीस शिपाई)

शकील युसूफ शेख ( पोलीस शिपाई) 

विश्वनाथ पेंदाम ( पोलीस शिफाई) 

विवेक नारोटे ( पोलीस शिपाई)

मोरेश्वर पोटवी ( पोलीस शिपाई)

कैलास कुलमथे (पोलीस शिपाई)

कोठला कोर्मी ( पोलीस शिपाई)

कोर्के वेलडी ( पोलीस शिपाई)

महादेव वानखडे ( पोलीस शिपाई)

आयपीएस अनुज तारे (अतिरिक्त पोलिस अधिक्षक)

राहुल देव्हडे (पोलीस उपनिरीक्षक)

विजय सकपाळ ( पोलीस उपनिरीक्षक)

महेश मिच्छा ( हेड कॉन्स्टेबल)

समया असम ( नायक पोलीस शिपाई)


कोण कोणत्या क्षेत्रांमध्ये दिलं जातं शौर्य पदक  :

लष्कर पोलीस - सशस्त्र दलातील जवानांनी लढाईत किंवा इतर लष्करी कारवायांमध्ये असामान्य शौर्य दाखविल्याबद्दल पुरस्कृत केलं जातं. 

परमवीर चक्र - सर्वोच्च लष्करी बहुमान पुरस्कार आहे. युद्धातील शौर्य आणि बलिदानासाठी मरणोत्तर हा पुरस्कार दिला जातो. मेजर सोमनाथ शर्मा यांना पहिलं परमवीर चक्र प्रदान करण्यात आलं होतं. 

महावीर चक्र - परमवीर चक्रानंतरचा हा दुसरा सर्वौच्च पुरस्कार आहे. हा पुरस्कार सैनिकांना त्यांचा युद्धातील शौर्य आणि बलिदानासाठी देण्यात येतं. हा पुरस्कार मरणोत्तरही दिला जातो 

वीर चक्र - एखाद्या जवानाला युद्धात वीरमरण येतं अशावेळी त्याचा वडिलांना किंवा पत्नीला हा पुरस्कार देऊन सैनिकांच्या शौर्याचा सन्मान केला जातो. 

अशोक चक्र - शांततेच्या काळात दिला जाणारा हा शौर्य पुरस्कार आहे. युद्धात अतुलनीय शौर्य, साहस आणि बलिदानासाठी हा पुरस्कार दिला जातो. 

कीर्ती चक्र - असाधारण शौर्य आणि बलिदानासाठी हा सन्मान सैनिक आणि गैर-सैनिकांना दिला जातो. 

नागरी शौर्य पदक -  गैर-लष्करी किंवा पोलीस क्षेत्राव्यतीरिक्तल अडचणीत सापडलेल्यांचा जीव वाचवणे, गुन्हेगारी रोखणे किंवा नैसर्गिक आपत्तींचा सामना करणे यासारख्या साहसी कृत्यांसाठी नागरिकांचा सन्मान केला जातो.
इतर बातम्या
Join Whatsapp Group