देवदर्शनासाठी निघालेल्या दोन सख्ख्या जावांसह चिमुकल्याचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू
देवदर्शनासाठी निघालेल्या दोन सख्ख्या जावांसह चिमुकल्याचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू
img
Dipali Ghadwaje
कोल्हापूर : श्रावणात देवदर्शनासाठी निघाले मात्र वाटतच दोन सख्ख्या जावांसह एका लहान मुलाचा मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना घडलीये। कोल्हापूर-सांगली महामार्गावर रामलिंग फाट्यावर सोमवारी (२१ ऑगस्ट) सायंकाळी प्रवासी रिक्षा आणि एसटी बसची समोरासमोर धडक झाली. या घटनेत रिक्षामधून प्रवास करणाऱ्या तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. 

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार ,या घटनेतील मृतांमध्ये दोन सख्ख्या जावांसह एका लहान मुलाचा समावेश आहे.  याशिवाय अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाले. शिवानी घेवरचंद खत्री (वय ३२), ललिता अंतराज खत्री (४०) आणि श्रीतेज विलास जंगम (९, सर्व रा. इचलकरंजी) अशी मृतांची नावे आहेत. तर रिक्षाचालक प्रशांत पेटकर व कियान घेवरचंद खत्री गंभीर जखमी आहेत.

दरम्यान जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, इचलकरंजी येथील रिक्षाचालक प्रशांत पेटकर रिक्षामधून दोन महिला आणि दोन लहान मुलांना घेऊन श्रावण सोमवार निमित्त रामलिंग धुळोबा डोंगरातील मंदिराकडे निघाले होते. दरम्यान, हातकणंगलेहून महामार्गावरून रामलिंग फाट्याकडे वळण घेत असताना, कोल्हापूरहून आलेल्या कुडाळ-पंढरपूर एसटी बसने त्यांच्या रिक्षाला जोरदार धडक दिली. 

ही धडक इतकी भीषण होती, की शिवानी आणि श्रीतेज दोघे जागीच ठार झाले. गंभीर जखमी ललिता यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मुख्य रस्त्यावरच अपघात झाल्याने वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. 

सांगली-कोल्हापूर रस्त्यावरून रामलिंग तीर्थक्षेत्राकडे जाण्यासाठी मार्ग आहे. मात्र दोन्ही बाजूंनी भरधाव वाहने आणि रामलिंगकडे जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांमुळेचे नेहमीच अपघात होतात. त्यामुळे रामलिंग फाटा येथील वळण धोकादायक ठरले आहे. घडलेल्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात  आहे. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group