अणुशास्त्रज्ञ पद्मश्री शिवराम भोजे यांचे निधन, कसबा सांगाव येथे आज होणार अंत्यसंस्कार
अणुशास्त्रज्ञ पद्मश्री शिवराम भोजे यांचे निधन, कसबा सांगाव येथे आज होणार अंत्यसंस्कार
img
वैष्णवी सांगळे
ज्येष्ठ भारतीय अणुशास्त्रज्ञ व शिवाजी विद्यापीठाचे माजी शैक्षणिक सल्लागार ‘पद्मश्री’ डॉ. शिवराम बाबुराव भोजे यांचे मंगळवारी निधन झाले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेत, देशाच्या अणुऊर्जा विभागात अमूल्य योगदान देणार्‍या भोजे यांनी 83 व्या वर्षी राजारामपुरी परिसरातील राहत्या घरी दुपारी साडेचार वाजता अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने विविध क्षेत्रांतून शोक व्यक्त करण्यात आला. 

आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२५ : 'या' राशीच्या लोकांनी आज वाहन जपून चालवावे

त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली असा परिवार आहे. संशोधन आणि विकासातील योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून फुफ्फुसाचा संसर्ग झाल्याने त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यातून बरे झाल्यानंतर रुग्णालयातून त्यांना घरी सोडण्यात आले. मात्र, मंगळवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. आज त्यांच्या पार्थिवावर मूळ गावी कसबा सांगाव येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. 

इस्रायलचा येमेनवर सर्वात मोठा हल्ला; इस्रायल-येमेन यांच्यातील संघर्ष वाढण्याची शक्यता

कागल तालुक्यातील सांगावच्या असलेल्या शिवराम भोजे यांनी अणुक्षेत्राच्या संशोधनात भरीव काम केले होते. विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय सेवेसाठी भारत सरकारने २००३ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. डॉ. भोजे हे ४० वर्षे वेगवान ब्रीडर अणुभट्टी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कार्यरत होते. अणुशास्त्रज्ञ म्हणून इंदिरा गांधी सेंटर फॉर अॅटोमिक रिसर्चचे संचालक होते. सेवानिवृत्तीवर विविध शैक्षणिक संस्थाशी संबंध होता.


इतर बातम्या
Join Whatsapp Group