बायको नकोशी, प्रेम संबधातून दुसऱ्याच तरुणीला केलं गर्भवती, पुढे घडलं ते धक्कादायक होतं
बायको नकोशी, प्रेम संबधातून दुसऱ्याच तरुणीला केलं गर्भवती, पुढे घडलं ते धक्कादायक होतं
img
दैनिक भ्रमर
एक तरफ है घरवाली एक तरफ बाहरवाली हे असं चित्र आता चित्रपटातून बाहेर निघून अनेकांच्या आयुष्यात प्रत्यक्षात घडत आहे. लग्नानंतरही अनेक पुरुष किंवा स्त्रिया इतर व्यक्तीशी संबंध ठेवतात. अशा प्रकारांमुळे संपूर्ण कुटुंबेच उद्ध्वस्त होत आहे. अनेक प्रकरणात लग्नाचे आमिष दाखवत महिला आणि तरुणींचे शोषण केल्याच्या घटना घडत आहे. त्यातून पुढे फसवणूक झाल्याचे ही उघड होत आहे. काही प्रकरणांना नंतर तर गंभीर वळण निर्माण होत आहे. अशीच एक धक्कादायक घटना कोल्हापुरातील शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या अंतर्गत झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात प्रियकर हा विवाहीत असताना ही त्याने एका तरुणीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं होतं. 

प्रफुल्ल जाधव हा विवाहीत आहे. तो कोल्हापुरात राहतो. विवाह झाला असताना ही त्याने एका तरुणीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. शिवाय मी माझ्या बायकोला सोडणार आहे. त्यानंतर आपण लग्न करू असं आश्वासन ही त्याने तिला दिलं होतं. त्याच्या बोलण्यावर ही तरुणी भूलली. त्याच्यावर विश्वास ठेवला. दोघांमध्येही शारीरिक संबंध तयार झाले.  

शरिर संबंधातून तरूणी गर्भवती
पत्नीला सोडणार आहे असं प्रफुल्लने सांगितलं होतं. त्यावर आपण विश्वास ठेवला. त्यानंतर तो वारंवार आपल्याला वेगवेगळ्या  रिसॉर्टवर घेवून जात होता. तिथेच तो अत्याचार करत होता असं  तरुणीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. या शरिर संबंधातून तरूणी गर्भवती राहीली होती. तिला तीन महिने ही झाले होते. याबाबत तिला समजल्यानंतर ती घाबरली. याबाबत प्रफुल्ल याला सांगितलं पाहीजे असं तिला वाटलं. त्यानंतर ती ताडीने प्रफुल्लकडे गेली. 

वारंवार केलेल्या शरिरसंबंधातून गर्भवती राहीली असल्याचं तिने त्याला सांगितलं. शिवाय तीसरा महिना सुरू असल्याचं ही तिने त्याला सांगितलं. मात्र ही ऐकताच प्रफुल्ल संतापला. त्याने त्या तरुणीला शिवागाळ करण्यास सुरूवात केली. तिला तो धमकी देवू लागला. त्यामुले घाबरलेल्या तरुणीने थेट शाहूपुरी पोलिस ठाणे गाठले. तिने त्याच्या विरोधात लैंगिक छळाचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाला आहे. शाहूपुरी पोलीस ठाणे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group