कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. ६ महिलांनी हाताच्या नसा कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. धक्कादायक म्हणजे महिला सुधारगृहातच हा प्रकार घडला आहे. प्राथमिक माहितीनुसार रिसॉर्टवर अश्लील नृत्य आणि वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांवर वारंवार कारवाई झाल्यानंतर कोर्टाने संबंधित महिलांना महिला सुधारगृहात ठेवण्याचे आदेश दिले होते. गेल्या दोन महिन्यांपासून या महिला सुधारगृहात होत्या.

मात्र, त्या ठिकाणाहून जामीन मिळावा याच्यासाठी वारंवार अर्ज करत होत्या. मात्र, त्यांना जामीन मिळत नसल्याने नैराश्यामध्ये येऊन त्यांनी आपल्या हाताच्या नसा कापून घेण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे. या सगळ्या पीडितांवर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू केले आहेत