संतापजनक! अवघ्या तीन वर्षीय चिमुरडीचे 60 वर्षीय आजोबानेच केले लैंगिक शोषण
संतापजनक! अवघ्या तीन वर्षीय चिमुरडीचे 60 वर्षीय आजोबानेच केले लैंगिक शोषण
img
DB
कोल्हापूर : राज्यात सातत्याने बलात्काराच्या घटना समोर येत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महिलांच्या संरक्षणांचा मुद्दा  ऐरणीवर आला आहे. अवघ्या तीन वर्षीय चिमुरडीचे आजोबानेच लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.

मिळालेल्या माहितीनुसार , करवीर तालुक्यातील एका गावात घडलेल्या घटनेनंतर पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी सीपीआरमध्ये आणण्यात आले. मुलीच्या आई-वडिलांचे जबाब नोंदवून करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित ६० वर्षीय आजोबाला पोलिसांनी ताब्यात घेतले.

नक्की काय घडले? 

पीडित मुलगी आई-वडिलांसोबत वरच्या मजल्यावर राहते. तर तिचा आजोबा तळमजल्यावर राहत होता. दररोज ही चिमुकली आजोबांसोबत खेळत होती. तो नातीला फिरायलाही घेऊन जात होता. दोन दिवसांपासून पीडित मुलीला त्रास होत होता. आजीने घरगुती औषधोपचार केले होते. तरीही त्रास होत असल्याने तिला खासगी दवाखान्यात नेण्यात आले होते. यावेळी येथील डॉक्टरांनी मुलीला विश्वासात घेऊन चौकशी केली असता तिच्या आजोबांनी केलेल्या कृत्याची माहिती दिली. 

खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी  मुलीच्या आई-वडिलांना याची माहिती देत पोलिसांत तक्रार करण्यास सांगितले. मंगळवारी दुपारी मुलीचे आई-वडील तिला घेऊन सीपीआर रुग्णालयात आले. तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तिने आजोबांनी केलेल्या प्रकाराची माहिती हातवारे करीत डॉक्टरांना व पोलिसांना दिली. पोलिसांनी   पीडित मुलीच्या आईचा जबाब नोंदवला. गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले.

इतर बातम्या
Join Whatsapp Group