धक्कादायक बातमी : कारागृहात तब्बल ७५ कैद्यांकडे सापडले मोबाइल! तुरुंग अधिकाऱ्यांसह ११ पोलीस निलंबित
धक्कादायक बातमी : कारागृहात तब्बल ७५ कैद्यांकडे सापडले मोबाइल! तुरुंग अधिकाऱ्यांसह ११ पोलीस निलंबित
img
DB
कळंबा कारागृहातुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कोल्हापूर शहरातील कळंबा कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या तब्बल ७५ हून अधिक कैद्यांकडे मोबाइल सापडले. हा प्रकार उघडकीस येताच शहरात मोठी खळबळ उडाली. याप्रकरणी २ अधिकाऱ्यांसह ९ पोलिस कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून कळंबा मध्यवर्ती कारागृहात कैद्यांकडे सतत मोबाइल सापडून येण्याच्या घटना घड आहेत. हीच बाब लक्षात घेता, पोलिसांच्या विशेष पथकाने कारागृहातील कैद्यांची झाडाझडती घेतली होती.

यावेळी खुल्या जागेत, भिंतीत, स्वच्छतागृहात आणि काही बॅरेकच्या कोपऱ्याजवळ मोबाइल लपवण्यात आले होते. हा संपूर्ण प्रकार उघड होताच कोल्हापूर येथील जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या प्रकरणाच्या चौकशीत कारागृहातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याचे आढळून आले. त्यामुळे दोन तुरुंग अधिकाऱ्यांसह ९ कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आलं आहे.

यामध्ये तुरुंग अधिकारी सोमनाथ म्हस्के, सतीश कदम, कर्मचारी तानाजी गायकवाड, अभिजित गोसावी, वैभव पाटील, रवी पवार, अनिकेत आल्हाट, सुहास वरखडे, संजय टिपगुडे, स्वप्नील हांडे, वैशाली पाटील, अशी बडतर्फ करण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहेत.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group