'तो' निळा ड्रम आणि मर्डर मिस्ट्रीचा अखेर खुलासा; मेरठ हत्याकांडातून घेतली आयडिया
'तो' निळा ड्रम आणि मर्डर मिस्ट्रीचा अखेर खुलासा; मेरठ हत्याकांडातून घेतली आयडिया
img
वैष्णवी सांगळे
दैनिक भ्रमर : काही दिवसांपूर्वी राजस्थानच्या अलवर येथील किशनगड परिसरातील आदर्श नगर कॉलनीत निळ्या रंगाच्या ड्रममध्ये पोलिसांना मृतदेह सापडला होता. ड्रममध्ये अशाप्रकारे मृतदेह ठेवल्याने परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले होते. त्यात हत्या झालेल्या इसमाची पत्नी आणि मुले देखील गायब होती. आता याच प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. 

पुन्हा निळा ड्रम ! पतीचा मृतदेह निळ्या ड्रममध्ये; पत्नी, मुलं अन घरमालकाचा मुलगाही गायब

खैरथल पोलीस अधीक्षक मनिष चौधरी यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात ते म्हणाले की, हंसराजच्या हत्येमागे प्रेम प्रकरण असल्याचं उघड झाले. मृतकाची पत्नी लक्ष्मी आणि जितेंद्र शर्मा ( घरमालकाचा मुलगा ) या दोघांचे अनैतिक संबंध होते. १५ ऑगस्टच्या रात्री तिघे एकत्रित दारू प्यायला बसले होते. नशेत धुंद हंसराज झोपला होता, तेव्हा जितेंद्र त्याच्या छातीवर बसला आणि उशीने त्याचा चेहरा दाबला. लक्ष्मीने पतीचे दोन्ही पाय पकडले. त्यानंतर श्वास गुदमरल्यामुळे हंसराजचा काही वेळातच मृत्यू झाला असं त्यांनी सांगितले. 

ठाणे ते मुंबई CST सर्व लोकल सेवा आणि ट्रेन रद्द, स्थानकांवर प्रवाशांची गर्दी

पाणी साठवण्याच्या बहाण्याने घरमालकाकडून आरोपी पत्नी लक्ष्मीने ड्रम घेतला होता. अलीकडेच मेरठमध्ये झालेल्या निळ्या ड्रम हत्याकांडातून या दोघांना आयडिया मिळाली होती असं त्यांनी सांगितले. मृत हंसराजची पत्नी लक्ष्मीदेवी आणि तिचा प्रियकर जितेंद्र शर्मा या दोघांना अटक करण्यात आली आहे. तर हंसराजच्या ३ मुलांना सुरक्षितपणे त्यांच्या नातेवाईकांकडे सोपवण्यात आले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group