पती- पत्नीमध्ये वाद होणं ही काही नवीन गोष्ट नाही पण वाद टोकाला गेला की शेवट भयानक झाल्याचं अनेक घटनांमधून समोर आले आहे. जळगावच्या रावेर तालुक्यात देखील अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. ज्यामुळे परिसरात एकाच खळबळ उडाली आहे.
जळगावच्या रावेर तालुक्यातील निंभोरा बु. गावातील न्यू इंग्लिश स्कूलचे निवृत्त शिपाई हुसेन रसूल तडवी आणि माजी ग्रामपंचायत सदस्या हाजराबाई हुसेन तडवी (वय ६०) या दोघा पती पत्नीमध्ये वारंवार कोणत्या ना कोणत्या कारणावरून वाद होत होते. त्यात हुसेन तडवी हे पत्नी हाजराबाई तडवी यांना सतत मारहाण करून त्रास देत होता.
दरम्यान ३० ऑगस्टला दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. या वादात संतापलेल्या हजराबाई यांनी हुसेन तडवी यांच्या मानेवर व डोक्यावर कुऱ्हाडीने वार करून खून केला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर मारेकरी हाजराबाई तडवी यांना पोलिसांनी अटक केली आहे.