राजेंद्र हगवणेला मदत करणाऱ्या चोंधे कुटुंबाचा धक्कादायक कारनामा समोर ; वाचा नेमकं काय प्रकरण?
राजेंद्र हगवणेला मदत करणाऱ्या चोंधे कुटुंबाचा धक्कादायक कारनामा समोर ; वाचा नेमकं काय प्रकरण?
img
DB
वैष्णवी हगवणे प्रकरण राज्यभर गाजलं आहे. सासरच्या मंडळींकूडन होत असलेल्या अतोनात छळामुळे वैष्णवीने आत्महत्या केली होती. दरम्यान, या प्रकरणात अनेक धागेदोरे रोज नव्याने समोर येत आहेत. 

या प्रकरणात हगवणे कुटुंब अटकेत आहेत. असे असतानाच आता राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना मदत करणाऱ्या संकेत चोंधे याच्या कुटुंबाचा धक्कादायक कारनामा समोर आला आहे.

वैष्णवी हगवणेने आत्महत्या केल्यानंतर वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे आणि तिचा दीर सुशील हगवणे हे फरार होते. बरेच दिवस हे दोघे वेगवेगळ्या ठिकाणी राहत होते. या दिवसांत संकेत चोंधे नावाच्या व्यक्तीने त्यांना मदत केली होती. त्यांनी या दोघांना फिरायला थेट थार कार दिली होती. याच संकेत चोंधेचा एक कांड समोर आला आहे. संकेतच्या भावाच्या बायकोने चोंधे कुटुंबावर धक्कादायक आरोप केले आहेत.

संकेत चोंधेच्या भावाचे नाव सुयश चोंधे असे आहे. संकेतची भावजई म्हणजेच सुयशच्या पत्नीने चोंधे कुटुंबावर धक्कादायक स्वरुपाचे आरोप केले आहेत. या प्रकरणी  नवरा सुयस चोंधे याच्याविरोधात खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बायकोचा छळ व मारहाण केल्या प्रकरणी खडक पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आल्या.

संकेतच्या भावजईने त्यांच्या पतीविरोधात महिला आयोगाकडेही तक्रार केली होती. त्यानंतर 7 फेब्रुवारी रोजी चोंधेविरोधात खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तक्रारदार महिलेचा पती सुयश, सासू-सासरा, दीर यांनी अन्याय, अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. आता ही पीडित विवाहिता बाधवन पोलीस ठाण्यात पोहोचल्या असून हे या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.
 
 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group