भीषण अपघात : विवाह सोहळा आटपून परतत असताना आयशर कंटेनरने दिलेल्या जोरदार धडकेत एकाचा मृत्यू ; ९ जण जखमी
भीषण अपघात : विवाह सोहळा आटपून परतत असताना आयशर कंटेनरने दिलेल्या जोरदार धडकेत एकाचा मृत्यू ; ९ जण जखमी
img
Dipali Ghadwaje
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील रामपूर तांडा लहासर येथून विवाह सोहळा आटोपून क्रूझरने घराकडे परतत असताना जामनेर-पहर मार्गावर सोनाळा फाट्याजवळ एक भीषण अपघात झालाय. 

मिळालेल्या माहितीनुसार ,  समोरून भरधाव येणाऱ्या आयशर कंटेनरने जोरदार धडक दिल्याने अपघात होऊन क्रूझर उलटली. या भीषण दुर्घटनेत नवरदेवाचे काका दशरथ रतन चव्हाण हे जागीच ठार झाले. तर अन्य नऊ वऱ्हाडी जखमी झाले आहेत. 

घटनेची माहिती मिळताच आजूबाजूच्या लोकांसह वहऱ्हाडातीलच अन्य वाहनांमधील नातेवाइकांनी जखमींना पहूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन कंटेनरसह चालकास ताब्यात घेतलं. या प्रकरणी पहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.
इतर बातम्या
Join Whatsapp Group