दारू देण्यास नकार दिल्याने हॉटेल मालकावर गोळीबार झाला झाल्याची धक्कादायक घटना जळगावमधील यावल तालुक्यातील चिंचोली गावाजवळील आडगाव फाट्यावर घडली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , दारू देण्यास नकार दिल्याने हॉटेल मालकावर चक्क गोळीबार करण्यात आला . गुरुवारी रात्री ९:३० च्या सुमारास घडली आहे. प्रमोद श्रीराम बाविस्कर असे जखमी हॉटेल मालकाचे नाव आहे. त्यांच्या मानेला गोळी लागल्याने ते गंभीर जखमी झाले.
हॉटेल मालक प्रमोद बाविस्कर काल रात्री ९:३० च्या सुमारास आपले हॉटेल बंद करून जळगावला जाण्यासाठी कारमध्ये बसले. त्याचवेळी दोन जण त्यांच्याजवळ आले आणि हॉटेल सुरु करून दारू देण्याची मागणी केली.
बाविस्कर यांनी हॉटेल बंद केले सांगितले असता संतप्त झालेल्या हल्लेखोरांनी बंदूक काढून थेट बावीस्करांवर रोखली. आणि त्यांच्या दिशेने गोळीबार केला.
या गोळीबारात बावीस्करांच्या मानेला गोळी लागल्याने ते जागीच कोसळले. घटनेनंतर हल्लेखोरांनी तिथून पळ काढला. बावीस्करांच्या मुलाने आणि इतर कर्मचाऱ्यांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांची प्रकृती ठीक आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी पंचनामा करण्यास सुरुवात केली. हल्लेखोर अद्यापही फरार असून पोलीस त्यांचा तपास घेत आहेत.