एक मोठी बातमी समोर आली आहे. देशात आणि राज्यात लवकरच बॉम्ब ब्लास्ट होणार असल्याचा धमकीचा एक मेल आलेला आहे. महाराष्ट्र नियंत्रण कक्षाकडून मुंबई पोलिसांना यासंदर्भात माहिती देण्यात आलेली आहे. या मेलमध्ये 2 दिवसात बॉम्ब ब्लास्ट होणार असल्याचा दावा करण्यात आलेला आहे. तसंच राज्यात कुठेही दुर्लक्ष करू नका, असंही या मेलमध्ये म्हंटलेलं आहे.
दरम्यान, धमकीच्या या मेल मुळे एकच खळबळ उडाली आहे. हा मेल कोणी केला याचा तपास सध्या सुरू आहे. सोमवार ते बुधवारदरम्यान सतर्क रहा असं या मेलमध्ये म्हंटलं आहे. राज्याच्या डिजास्टर मॅनेजमेंट रूमला हा मेल आलेला आहे. या मेलमुळे खळबळ उडाली असून 3 दिवसात राज्यात किंवा राज्याच्या बाहेर कुठेही बॉम्बब्लास्ट होऊ शकतो अशा आशयाचा हा मेलचा आशय आहे.