लग्नाचं आमिष दाखवून महिलांवर बलात्कार होत असल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. सांगलीमध्ये देखील अशीच एक घटना समोर आली आहे. लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना याठिकाणी समोर आली आहे.
हे ही वाचा
मिळालेल्या माहितीनुसार, सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील वंचितचे जिल्हाध्यक्ष शंकर मानेने लग्नाचे आमिष दाखवून पीडितेवर वारंवार जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले आणि तिला गरोदर केले. या पीडितेल मुल देखील झाले. फिर्यादीने मुलाच्या कागदपत्रांसाठी कवठेमहांकाळ येथील कार्यालयात अर्ज केल्यावर आरोपी शंकर माने यांच्यासह शोभा माने, सिद्धू माने आणि सविता माने या चौघांनी मिळून पीडित महिलेला मारहाण केली.
हे ही वाचा
त्यामुळे पीडितेने पोलिसांकडे धाव घेतली. याप्रकरणी कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शंकर मानेला कवठेमहांकाळ पोलिसांनी पहाटे राहत्या घरातून अटक केली. लग्नाचे आमिष दाखवून पीडितेवर वारंवार बलात्कार केल्याचा आरोप शंकर मानेवर आहे. कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात पीडित महिलेने फिर्याद दिल्यानंतर आरोपीविरोधात पोलिसांनी कारवाई केली. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.