गेल्या काही दिवसांपासून अभिनेता गोविंदा त्याची पत्नी सुनीता अहुजा घटस्फोटाची जोरदार चर्चा सुरू आहे. इतकंच काय तर सुनीता अहुजानं घटस्फोटासाठी कोर्टात अर्ज दाखल केलाय इथपर्यंत ही चर्चा पोहोचलीय. गोविंदा आणि सुनीताच्या घरीही लाडक्या गणरायाचं आगमन झालंय. यावेळी माध्यमांनी त्यांना घटस्फोटाच्या चर्चांवर विचारणा केली. त्यावर या चर्चांना तिनं पूर्णविराम दिलाय.
हे ही वाचा
आम्हाला दोघांना कुणीही वेगळं करू शकणार नाही
आज आम्हाला सोबत बघून तसं वृत्त देणाऱ्यांना चपराक बसली आहे. जर तसं काही असतं तर आम्ही इतक्या जवळ असतो का? आमच्यात दुरावा असता. आम्हाला दोघांना कुणीही वेगळं करू शकणार नाही. वरून देव जरी आला तरी किंवा सैतान जरी आला तरी आम्हाला वेगळं करता येणं शक्य नाही. एका चित्रपटात डायलॉग होता, माझा नवरा फक्त माझा आहे, तसंच माझा गोविंदा फक्त माझा आहे. दुसऱ्या कुणाचाही नाही. आम्ही जोपर्यंत काही बोलत नाही तोपर्यंत कुणीही काही बोलू नका, अशी विनंतीही तिनं केलीय.