टीव्ही वरील कलाकार हे अनेकांचे आयडॉल असतात. ते जस करतील तास करण्याच्या प्रयत्नात असतात. चाहत्यांना कपलगोल्स देणारे कलाकार अनेकदा मात्र स्वतः अचानक घटस्फोटाच्या वाटेवर चालत असतात. असाच एक धक्का टीव्हीवरील लोकप्रिय कपलने बिग बॉसमध्ये येण्यापूर्वी दिला. पण या शोचा भाग झाल्यानंतर त्यांच्या आयुष्यात असे काही बदल झाले ज्यामुळे त्यांचे नाते पूर्ववत झाले.
हे ही वाचा
रुबीना दिलैक आज तिचा ३७ वा वाढदिवस साजरा करत आहे. रुबीना आणि तिचा नवरा अभिनव शुक्ला दोघेही सध्या कलर्स वाहिनीवरील पती पत्नी और पंगा या शोमध्ये दिसतायत. यापूर्वी दोघांनी बिग बॉस 18 मध्ये एकत्र सहभाग घेतला होता. यामध्ये रुबीना विजेती झाली होती.
हे ही वाचा
रुबिना आणि अभिनव यांचे लग्न २०१८ मध्ये झाले होते मात्र त्यांच्यानात्यात वारंवार वाद होत होते त्यामुळे दोघांनीही घटस्फोटाचा निर्णय घेतला. बिग बॉस मध्ये जाण्यापूर्वीच रुबीना आणि तिचा नवरा अभिनवने कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. त्यात सामंजस्यासाठी त्यांना 6 महिन्यांची मुदत मिळाली. या मुदतीतच त्यांनी या शोमध्ये एण्ट्री केली. आणि धक्कादायक म्हणजे या शोमध्ये दोघांच्याही जबरदस्त बॉन्डिंगने प्रेक्षकांची मने जिंकली. रुबीना ज्या पद्धतीने तिच्या नवऱ्यासाठी भूमिका घेत असे ते सर्वांना आवडले, तर अभिनवनेही रुबीनाला कधीही एकटे सोडले नाही.
हे ही वाचा
आता अलीकडेच 'पती, पत्नी और पंगा'च्या सेटवर रुबीनाने खुलासा केला की 'बिग बॉस ' मध्ये येण्यापूर्वी तिचा आणि अभिनवचा घटस्फोट होणार होता. पण या शोमध्ये येऊन त्यांनी त्यांच्या नात्याला आणखी एक संधी दिली आणि दोघांचाही लग्न वाचवण्याचा हा प्रयत्न यशस्वी झाला. आता रुबीना आणि अभिनव एकमेकांच्या सहवासात सुखी असून त्यांच्या संसारवेलीवर दोन छान जुळ्या मुलीही आल्या आहेत. ज्यांची नावे त्यांनी जीवा आणि एधा असे ठेवले आहे.