हुंडाबळीच्या घटना थांबताना दिसून येत नाहीये. ग्रेटर नोएडाच्या निक्की हत्याकांडाची घटना ताजी असतानाच राजस्थानातून धक्कादायक घटना समोर आली आहे. जोधपूरमधील पीडित महिलेनं सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या हुंड्याच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली आहे.
हे ही वाचा
नेमकं काय घडलं ?
जोधपूरमधील सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या हुंड्याच्या छळाला कंटाळून संजू बिश्नोई या शिक्षक असलेल्या महिलेने आत्महत्या केली. संजू शुक्रवारी दुपारी शाळा सुटल्यानंतर घरी परतली. तिनं ३ वर्षाच्या आपल्या लेकीला जवळ घेतलं. अंगावर पेट्रोल ओतून घेतलं. महिलेनं स्वत:ला पेटवून घेतलं नंतर निष्पाप मुलीलाही पेटवून घेतलं. यात मुलगीही भाजली गेली. घटनेच्या दिवशी पती, सासू -सासरे घरी उपस्थित नव्हते.
हे ही वाचा
परिसरातील नागरिकांनी धूर पाहून कुटुंबातील सदस्यांना माहिती दिली. त्यानंतर त्यांनी घराच्या दिशेनं धाव घेतली. तसेच संजू आणि चिमुकलीला तातडीने रूग्णालयात दाखल केले. मात्र, मुलीला डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर, पीडित महिलेचा उपचारादरम्यान, मृत्यू झाला.
हे ही वाचा
पोलिसांना तपासात एक सुसाईड नोट देखील सापडली आहे. ज्यामध्ये हुंडा मागण्याचे कारण दिले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजू शुक्रवारी दुपारी शाळा सुटल्यानंतर घरी परतली. तिनं लेकीला जवळ घेतलं. अंगावर पेट्रोल ओतून घेतलं. शवविच्छेदनानंतर पोलिसांनी मृतदेह पीडितेच्या घरच्यांना दिला. पीडितेच्या घरच्यांनी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी पती दिलीप बिश्नोई, सासू आणि सासऱ्यांविरोधात हुंड्यासाठी छळ आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करत एफआयआर दाखल केला.