हत्या की आत्महत्या ? प्रेमाचा अंत मात्र फार वाईट झाला, ऐकून तुम्हालाही बसेल धक्का
हत्या की आत्महत्या ? प्रेमाचा अंत मात्र फार वाईट झाला, ऐकून तुम्हालाही बसेल धक्का
img
दैनिक भ्रमर
उत्तर प्रदेशातील संभळ जिल्ह्यातील हयात नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आंबेडकर वस्तीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हत्या की आत्महत्या ? ही चर्चा सध्या परिसरात चालू आहे. 

सौरभ हा 20 वर्षाचा तरुण होता. तर मोहिनी तिचे ही वय 20 वर्ष आहे. हे दोघे एका बटाटा मिलमध्ये एकत्र काम करत होते. त्यांचे गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोन दिवसांपूर्वी मुलाच्या बॅगेत 10 हजार रुपये आणि मुलीचे कपडे सापडले होते. त्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये पंचायत झाली. ज्यात दोघांनी वेगळे होण्याचं मान्य केलं होतं. 

सौरभचा मृतदेह त्याच्या प्रेयसीच्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्याने परिसरात एकाच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर प्रेयसी आणि तिचे कुटुंबीय फरार झाले आहेत. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली असून ही आत्महत्या आहे की हत्या असा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रियकराने मृत्यूच्या अवघ्या 4 तास आधी प्रेयसीसोबतचा स्टेटस आपल्या मोबाईलवर ठेवला होता. त्याच्या काही मिनिटानंतरच ही धक्कादायक घटना घडली आहे. 

मृताच्या वडिलांकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. यात मुलीचे वडील विजयपाल आणि तिचे दोन भाऊ कमल आणि रामवीर यांच्यावर सौरभला फाशी देऊन हत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. घटनास्थळावरून फॉरेन्सिक टीम पुरावे गोळा करत असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group