फेसबुक लाईव्ह करत तरुणानं उचललं टोकाचं पाऊल, खळबळजनक कारण समोर
फेसबुक लाईव्ह करत तरुणानं उचललं टोकाचं पाऊल, खळबळजनक कारण समोर
img
वैष्णवी सांगळे
पिंपरी-चिंचवडमधून एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पत्नी आणि मुलगी घर सोडून गेल्याच्या मानसिक तणावातून एका तरुणाने फेसबुक लाईव्ह करत आत्महत्या केल्याची घटना भोसरी परिसरात घडली आहे. केशरी प्रसाद शाहू असं या तरुणाचं नाव आहे. ही घटना काल दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. केशरी प्रसाद शाहू याने भोसरीतील भाजी मंडईच्या दुसऱ्या मजल्यावरील पाण्याच्या टाकीवरून उडी घेत आपलं जीवन संपवलं.गुरुवारी (5 फेब्रुवारी) दुपारी 4.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडलीय. आत्महत्येपूर्वी त्याने फेसबुक लाइव्ह करत आपली व्यथा मांडली होती, या व्हिडीओमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, केशरी प्रसाद शाहू हा गेल्या काही दिवसांपासून पत्नी आणि मुलीपासून वेगळा राहत असल्यामुळे प्रचंड तणावात होता. गुरुवारी (5 फेब्रुवारी) दुपारी 4.30 वाजण्याच्या सुमारास त्याने भाजी मंडई गाठली. येथील पाण्याच्या टाकीवर चढून त्याने फेसबुक लाइव्ह केले. या व्हिडीओमध्ये तो आपल्या पत्नी आणि मुलीची आठवण काढून ढसाढसा रडताना दिसतोय. फेसबुक लाइव्हमध्येच पत्नी-मुलीचा विरह सहन होत नसल्याचे सांगत त्याने टाकीवरून उडी घेतली. 

या घटनेचा तपास भोसरी पोलीस करत आहेत. पोलिसांना घटनास्थळी तीन पानांचे सुसाइड नोट सापडलीय. सुसाइड नोटमध्ये त्याने काही लोकांवर गंभीर आरोप केले आहेत. याच लोकांनी पत्नीला पळून जाण्यासाठी मदत केल्याचा आरोप त्यानं चिठ्ठीमध्ये केलाय. केशरीने सुसाइड नोटमध्ये लिहिलंय की, "मी पूर्ण शुद्धीत ही चिठ्ठी लिहीत आहे. माझ्या पत्नीला पळवून लावण्यात काही जणांचा सहभाग आहे. त्यांना तिचं सध्याचं ठिकाण माहिती आहे, असा माझा आरोप आहे. माझ्या आणि तिच्या वादाचा गैरफायदा घेऊन पत्नीला पळवून लावलंय. माझ्या मृत्यूस तेच जबाबदार असून मला न्याय हवाय. सोनं-चांदी घेतल्याचा आणि मला धमकावल्याचा आरोपही आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही तपासलं नाही, याबाबतही तक्रार आहे. मला पत्नी-मुलीसोबत आयुष्य जगायचं होतं, मुलीवर माझं अपार प्रेम आहे. एक नंबर खोलीतील व्यक्तींवर संशय आहे". 

या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत भोसरी पोलीस पुढील तपास करत आहेत. सुसाइड नोटमध्ये नाव असलेल्या व्यक्तींची चौकशी होण्याची शक्यता आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group