संतापजनक कृत्य ! पोटच्या १५ वर्षाच्या मुलीवर केला नराधम पित्याकडून बलात्कार
संतापजनक कृत्य ! पोटच्या १५ वर्षाच्या मुलीवर केला नराधम पित्याकडून बलात्कार
img
वैष्णवी सांगळे
पुण्यातील चाकण दावडमळा परिसरात एक संतापजनक अशी नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. जन्मदाता बापच लेकीसाठी हैवान ठरलाय. १५ वर्षाच्या मुलीला घरात एकटं पाहून क्रूर पित्याची नियत फिरली. लेकीला धमकावून नराधम बापाने लेकीवरच बलात्कार केला.  याप्रकरणी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून नराधम बापाला अटक करण्यात आली आहे. 



चाकण दावडमळा परिसरातील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या सख्ख्या वडिलांनी जबरदस्तीने अत्याचार केल्याचा आरोप पीडित मुलीने चाकण पोलीसांत दिलेल्या तक्रारीत केला आहे. पीडित मुलगी घरी एकटी असताना आरोपीने तिला धमकावून जबरदस्तीने अत्याचार केला. या प्रकरणात सर्वात धाडसी बाब म्हणजे, १५ वर्षीय पीडित मुलीने स्वतः पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्वरित कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्या.

सध्या आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत (बालकांविरुद्ध लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा) आणि संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. ही घटना उघडकीस आल्यानंतर चाकण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group