संतापजनक ! स्कूल व्हॅनमध्ये चिमुकलीवर लैंगिक अत्याचार, 'त्या' स्कूल व्हॅनबाबत धक्कादायक माहिती समोर
संतापजनक ! स्कूल व्हॅनमध्ये चिमुकलीवर लैंगिक अत्याचार, 'त्या' स्कूल व्हॅनबाबत धक्कादायक माहिती समोर
img
वैष्णवी सांगळे
साधारण दीड वर्षांपूर्वी बदलापूरच्या शाळेत काही चिमुकल्या मुलींवर अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. या केसमध्ये शाळेतील शिपाई अक्षय शिंदे हाच आरोपी असल्याचेही समोर आले, नंतर त्याला अटक करून केस चालवण्यात आली. पोलिस एन्काऊंटरमध्ये त्याचा मृत्यूही झाला. हे प्रकरण प्रचंड गाजलं. मात्र या दुर्दैवी घटनेच्या, जखमा मनात अजूनही ताज्या असतानाच त्याच बदलापूरमध्ये असाच एक भयानक, नृशंस प्रकार पुन्हा उघडकीस आला आहे. 

बदलापूर पश्चिमेकडील एका खाजगी शाळेत चार वर्षांची चिमुकली शिकत होती.विद्यार्थिनी नेहमीप्रमाणे शाळेतून घरी येत असताना व्हॅन चालकाने तिच्यावर अत्याचार केला. घरी पोहोचल्यावर विद्यार्थिनीने आई वडिलांना घडलेला प्रकार सांगितला. विद्यार्थिनीच्या लैंगिक शोषणासह मारहाणही झाली होती. संतापलेल्या पालकांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेतली.बदलापुरात पुन्हा एकदा चिमुकलीवर अत्याचाराची घटना घडल्यामुळे संतापाची लाट उसळलीय. सदर घटनेनंतर बदलापूर पोलीस ठाण्यातही तणावाचं वातावरण होतं. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तर चिमुकलीची सध्या वैद्यकीय तपासणी सुरु असल्याची माहिती आहे.

व्हॅनबाबत धक्कादायक माहिती उघड
बदलापूर पश्चिमेत स्कूल व्हॅनमध्ये चार वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचार प्रकरणानंतर प्रशासन खडबडून जागे झाले असून, कल्याण प्रादेशिक परिवहन कार्यालयाने संबंधित स्कूल व्हॅनवर कडक कारवाई केली आहे. तपासादरम्यान या स्कूल व्हॅन चालवण्यासाठी कोणतीही वैध परवानगी नसल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या गंभीर निष्काळजीपणाची दखल घेत RTOने संबंधित व्हॅनचा परवाना रद्द करत 24 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group