मोठी बातमी :
मोठी बातमी : "त्या" संतापजनक घटनेनंतर बदलापूर शहरात यंदा दहीहंडी उत्सव रद्द....
img
Dipali Ghadwaje
बदलापूर : दहीहंडी उत्सव सर्वत्र अगदी आनंदात व उत्साहात साजरा केला जात असतो. मात्र बदलापूर शहरात झालेल्या चिमुकल्या मुलींवरील अत्याचाराच्या घटनेनंतर यंदा शहरातील सर्व दहीहंड्याचा उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सामाजिक जाणिवेच्या भावनेतून शहरातील दहीहंडी उत्सव रद्द करण्यात आल्याची माहिती उत्सव आयोजकांनी दिली आहे.

बदलापूरमध्ये दोन आठवड्यांपूर्वी दोन चिमुकल्या मुलीवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याचे पडसाद राज्यभरात उमटले आहे. या घटनेमुळेच यंदा बदलापूरमध्ये कोठेही दहीहंडी फोडली जाणार नाही.

बदलापूर शहरात काँग्रेस शहर अध्यक्ष संजय जाधव यांच्या माध्यमातून दरवर्षी ५ लाख ५५ हजार ५५५ रुपयांची सर्वात मोठी दहीहंडी उभारली जाते.  अजय राजा हॉल समोर उभारली जाणारी ही दहीहंडी यावर्षी रद्द करण्यात आली आहे.

बदलापूर शहरात घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर सर्वप्रथम संजय जाधव यांनी दहीहंडी रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. यानंतर शहरातील सर्वच लहान मोठ्या दहीहंड्या रद्द करण्यात आल्या आहेत. 

एकीकडे आजचा दहीहंडी उत्सव रद्द करण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे. तर दुसरीकडे शहरातील साऊंड असोसिएशनने देखील यावर्षी कुठल्याही कार्यक्रमात डीजे न वाजवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दहीहंडीच्या दिवशी बदलापूर शहरात शुकशुकाट पाहायला मिळत आहे.

  
इतर बातम्या
Join Whatsapp Group