बदलापूर चिमुकल्यांवर अत्याचार प्रकरणी  फास्ट ट्रॅक मोड ऑन;  SIT चा तपास सुरु, वाचा सविस्तर
बदलापूर चिमुकल्यांवर अत्याचार प्रकरणी फास्ट ट्रॅक मोड ऑन; SIT चा तपास सुरु, वाचा सविस्तर
img
दैनिक भ्रमर
बदलापूरच्या शाळेमध्ये दोन चिमुकल्यांवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली  या घटनेनंतर मंगळवारी बदलापूरमध्ये उद्रेक पाहायला मिळाला . आता हे प्रकरण फास्ट ट्रॅक चालवणार असल्याचं सरकारने सांगितलं आहे. दरम्यान या  प्रकरणाविषयी  विषयी एक महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे . आता यामध्ये स्पेशल SIT टीम तपासणी करणार आहेत. ज्याअंतर्गत लवकरता लवकत या प्रकरणाचा निकाल लावण्यात मदत होईल असं म्हटलं जात आहे.

  • आरती सिंग यांनी पिडीतेचा जबाब नोंदवला आहे.  पिडित मुलीची आई आणि आजोबा यांचा देखील जबाब नोंदवला आहे. त्यांनी हा जबाब कुठल्यातरी अज्ञान ठिकाणी जाऊन नोंदवला आहे.
  • पिडित मुलीची ज्या डॅाक्टरांनी वैद्यकीय तपासणी केली त्यांचा देखील SIT जबाब नोंदवणार आहेत. याचाच अर्थ पुढील काही दिवस SIT पथक बदलापूर मध्ये ठाण मांडून बसणार.
  • एवढंच नाही तर लवकरच शाळेतील मुख्यध्यापिका आणि कर्मचाऱ्यांचा देखील SIT टीमकडून लवकरच जबाब नोंदवला जाणार आहे. 
  • या प्रकरणातील निलंबित तपास अधिकारी आणि त्यांच्यासहित बदलापूर पुर्व पोलिस स्टेशन मधील तीन कर्मचाऱ्यांची ही SIT चौकशी करणार आहेत.
  • बदलापूर अत्याचाराचं प्रकरण फास्ट ट्रॅक चालवणार असल्याचं सरकारने सांगितलं आहे. तसंच सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
बदलापूरच्या शाळेमध्ये दोन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण राज्यात  खळबळ माजली आहे.अत्याचाराच्या या घटनेविरोधात नागरिक रस्त्यावर उतरले. तसंच बदलापूर रेल्वे स्टेशनवर रेल रोको आंदोलनही करण्यात आलं.
इतर बातम्या
Join Whatsapp Group