बदलापूर प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट! आरोपी अक्षय शिंदेच्या वडिलांनी केला
बदलापूर प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट! आरोपी अक्षय शिंदेच्या वडिलांनी केला
img
DB
बदलापूर येथील एका नामांकित शाळेत अक्षय शिंदे नामक सफाई कामगाराने दोन मुलींचे लैंगिक शोषण केले. या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले. मंगळवारी बदलापूर येथे झालेल्या हिंसक आंदोलनामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. सध्या बदलापूरमध्ये तणावपूर्ण शांतता आहे. 

दरम्यान, आरोपी अक्षय शिंदेच्या खवई या गावातील घरावर काही नागरिकांनी काल रात्री हल्ला करत तोडफोड केली आहे. दरंयान या प्रकरणी आरोपी अक्षय शिंदेच्या वडिलांनी मोठा दावा केला आहे.

आई-वडील व लहान भावाशी मोबाईल फोनवरुन काहींनी संपर्क साधला असून त्यांनी धक्कादायक माहिती दिली आहे. त्यांनी दावा केला आहे की, अक्षय शिंदे हा निरपराध आहे. त्याने मुलींसोबत असा कोणत्याही प्रकार केलेला नाही. त्याला फसवण्यात येत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. एका वृत्तवाहिनीसही बोलतांना त्यांनी असा कोणताच प्रकार घडला नसल्याचं सांगितलं आहे. या प्रकारात त्याला फसवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group