मोठी बातमी : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीला
मोठी बातमी : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीला
img
Dipali Ghadwaje
बदलापूर अत्याचार प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. बदलापूरमधील शाळेत शिकणाऱ्या दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडल्यानंतर या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटताना दिसत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी अक्षय शिंदे याला  अटक केली होती. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. यानंतर न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

बदलापूरमधील दोन शालेय विद्यार्थिंनीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपी अक्षय शिंदेला अटक करण्यात आली होती. त्यानंतर आरोपी अक्षय शिंदेला पोलिसांनी कल्याण न्यायालयात हजर केले होते.  अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला न्यायालयात हजर करण्यापूर्वी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 

याप्रकरणी आता न्यायालयाने महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. आरोपी अक्षय शिंदेला  २६  ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.कल्याण न्यायालयातील न्यायाधीश वी ए पत्रावळे यांच्या दालनात ही सुनावणी पार पडली. यावेळी विशेष सरकारी वकील अश्विनी भामरे पाटील यांनी युक्तीवाद केला.

पोलिसांनी आरोपी अक्षय शिंदेला १७ ऑगस्टला अटक केली होती. त्यानंतर न्यायालयाने २१ ऑगस्टपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावली होती. यानंतर आज पुन्हा आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी कल्याण न्यायालयाने तपासातंर्गत २६  ऑगस्टपर्यंत ही पोलीस कोठडी वाढवली आहे. 


 
इतर बातम्या
Join Whatsapp Group