आताच एक मोठी बातमी समोर आली आहे. बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेंचा एन्काऊंटर करण्यात आला. अक्षय शिंदेच्या मृत्यूनंतर त्याच्या अंत्यविधीला विरोध होत असून दफण करण्यासाठी जागा मिळत नसल्याची तक्रार त्याच्या पालकांनी केली आहे.
या संदर्भात आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये महत्वाची सुनावणी पार पडली. या सुनावणीत सोमवारपर्यंत अक्षय शिंदेंच्या मृतदेहाचे दफन करा, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तसेच यासाठी राज्य सरकार जागा देणार असल्याचेही वकिलांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता या प्रकरणात पुढे काय होणार हे बघणं महत्वाचं ठरेल