बदलापूर शहर पुन्हा हादरले..!  अल्पवयीन मुलीवर अत्याचार
बदलापूर शहर पुन्हा हादरले..! अल्पवयीन मुलीवर अत्याचार
img
Dipali Ghadwaje
बदलापूर पुन्हा एकदा हादरले आहे.  काही दिवसांपूर्वी बदलापूर येथील एका नामांकित शाळेत तीन ते चार वर्षांच्या चिमुरडींवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा अशीच एक घटना बदलापूरात घडली आहे. 

शहरात पुन्हा एकदा अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने शहरात खळबळ माजली आहे. तर, अत्याचार करणारा नराधम दुसरा तिसरा कोणी नसून पीडित मुलीचा बापच असल्याचे समोर आले आहे. त्यामुळं परिसरात या नराधमाविरोधात एकच संताप व्यक्त करण्यात येत आहे. 

बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याचे हद्दीत एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे पीडित मुलीच्या वडिलांनीच तिच्यावर अत्याचार केला आहे. या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.  
इतर बातम्या
Join Whatsapp Group