अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरण; हायकोर्टाने सरकारकडे मागितले ‘हे’ पुरावे
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरण; हायकोर्टाने सरकारकडे मागितले ‘हे’ पुरावे
img
दैनिक भ्रमर
बदलापूर अत्याचार प्रकरणामधील आरोपी.अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणी उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणीवेळी न्यायाधीशांनी सरकारला आदेश देत या प्रकरणी काही पुरावे मागितले आहेत. 

 यावेळी न्यायाधीशांनी अक्षय शिंदेचा फॉरेन्सिक रिपोर्ट आहे का? ती गोळी नेमकी कुठे गेली? आरोपीला पाणी पिण्यासाठी त्याची बेडी काढली का? मग त्याने पाणी पिण्यासाठी काय वापरलं होत? असे अनेक प्रश्न विचारले. त्यावेळी सरकारी वकिलांनी ती गोळी गाडीच्या टपाला लागून बाहेर गेली. तसेच त्याला पाणी पिण्यासाठी जी पाण्याची बॉटल दिली होती, ती सापडली आहे, असा युक्तीवाद केला.

यावर कोर्टातील न्यायाधीशांनी चार गोळ्या झाडल्या ना? मग चार बुलेट शेल आहेत का? आणि दोन बंदुकीतून जर ४ गोळ्या झाडल्या तर मग २ वेगळे बुलेट शेल आहेत का? असा सवाल विचारला. यावेळी न्यायाधीश पृथ्वीराज चव्हाण यांनी याप्रकरणी बंदुकीच्या फिंगर प्रिंटच्या संदर्भात माहिती द्या, असे आदेश यावेळी दिले.

याप्रकरणाची न्यायालयीन चौकशी लवकरात लवकर करावी. तसेच पुढील सुनावणी येत्या 18 नोहेंबरला होईल. त्यावेळी सरकारने बॅलेस्टिक रिपोर्ट, बुलेट शेल आणि पोलिसाला लागलेल्या गोळीची जखम यासंदर्भात सगळे रिपोर्ट कोर्टात सादर करावे, असे यावेळी सांगितले. 

दरम्यान,  अक्षय शिंदे याला बेड्या ठोकल्या होत्या. पण त्याला पाण्याची तहान लागली. त्यामुळे पाणी पिण्यासाठी पोलिसांनी त्याच्या हातातल्या बेड्या काढल्या होत्या. पण त्यावेळी अक्षय शिंदे याने पोलिसांच्या कंबरेला असलेली बंदूक काढून गोळीबार केला, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी कोर्टात केला. त्यावर कोर्टाने काही प्रश्न उपस्थित केले. यावेळी कोर्टाने अक्षय शिंदे याच्या वकिलांनादेखील सुनावलं.
इतर बातम्या
Join Whatsapp Group