बदलापूर घटनेची चौकशी करण्यासाठी ''या'' वरिष्ठ IPS अधिकाऱ्याची नियुक्ती; देवेंद्र फडणवीसांची माहिती
बदलापूर घटनेची चौकशी करण्यासाठी ''या'' वरिष्ठ IPS अधिकाऱ्याची नियुक्ती; देवेंद्र फडणवीसांची माहिती
img
दैनिक भ्रमर
बदलापूर मध्ये शाळेत दोन चिमुरडींवर लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. बदलापूर संतप्त पालकांनी शाळेवर मोर्चा काढला आणि फाटकावर निदर्शनेही केली. तसेच  या घटने वरून  संतप्त नागरिकांनीर स्टेशनवर रेल रोको आंदोलन केलं. यानंतर आता पोलिसांनी लाठीचार्ज करत जमावाला पांगवलं आहे आणि रेल्वे स्टेशन खाली केलं आहे. दुसरीकडे जमावाकडून पोलिसांवर दगडफेकीची घटनाही घडली आहे.

दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रीया दिली आहे. बदलापूर येथील दुर्दैवी घटनेची चौकशी करण्यासाठी पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ IPS अधिकारी आरती सिंग यांची त्वरित नियुक्ती करण्यात आली आहे. तात्काळ चार्जशीट दाखल करून हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात येईल. अशा नराधमांना तात्काळ शिक्षा व्हावी, यासाठी राज्य सरकार आणि पोलीस विभाग प्रयत्नशील राहील. असे फडणवीस यांनी म्हटले.

दरम्यान , बदलापूरच्या नामांकित शाळेत सफाई कर्मचारी असलेल्या आरोपी अक्षय शिंदे याने 12 तारखेला एका मुलीचा विनयभंग केला, त्यानंतर त्याने 4 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार केले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात दिरंगाई केल्याचा आणि शाळेने तक्रार देऊनही कारवाई न केल्यामुळे जमाव संतप्त झाला आणि त्यांनी बदलापूर बंदची हाक दिली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group