बदलापुर घटनेतील आरोपी अक्षय शिंदे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याची प्राथमिक माहिती आहे . आरोपीने पोलिसांची बंदूक घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत एक पोलीस अधिकारी ही जखमी झाले आहे. अक्षय शिंदे हा गंभीर असल्याचं बोललं जात आहे. पोलिसांकडून अजून या बाबतीत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. आरोपीने शाळेतील अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप होता. सध्या पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले आहे. तळोजा कारागृहातून पोलीस त्याला बदलापूरला घेऊन येत असताना ही घटना घडल्याचं बोललं जातं आहे.
आरोपी अक्षयला चौकशीसाठी पोलीस जेलमधून घेऊन जात असताना अक्षयने जीपमधील पोलिसाच्या कंबरेवरील बंदूक हिसकावून तीन राऊंड फायर केले. यावेळी दुसऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याने प्रत्युरादाखल अक्षय शिंदेंवर गोळीबार केला. गोळीबारात अक्षय गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. अक्षयला जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, अक्षय शिंदेने तळोजा जेलमध्ये उपस्थित पोलीस कर्मचाऱ्याची बंदूक खेचण्याचा प्रयत्न केला आणि तीन गोळ्या झाडल्या. या झटापटीत एका पोलीस कर्मचाऱ्यालाही गोळी लागली आणि जखमी झाला आहे. दरम्यान एक गोळी अक्षय शिंदेला लागली आहे. अक्षय शिंदेची कोठडी आज संपली असून त्याला कोर्टात नेलं जात होतं. अक्षय शिंदेला सध्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.