आधी बदलापूर आता नंदुरबार !  शाळेत सफाई कर्मचाऱ्याकडून मुलीचा  विनयभंग
आधी बदलापूर आता नंदुरबार ! शाळेत सफाई कर्मचाऱ्याकडून मुलीचा विनयभंग
img
दैनिक भ्रमर
बदलापूरच्या शाळेत सफाई कामगाराने दोन चिमुकल्यांवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली त्यापाठोपाठ आता आता नंदुरबारमध्येही असाच खळबळजनक प्रकार समोर आला आहे. नंदुरबार शहरातल्या एका नामांकित शाळेत सफाई कामगाराने 10 वर्षांच्या मुलीला त्याच्या मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ दाखवल्याची घटना घडली आहे. पाचवीमध्ये शिकणाऱ्या मुलीसोबत हा प्रकार घडला आहे. संबंधित कर्मचारी मुलीला ग्रंथालयात घेऊन गेला होता,  त्याठिकाणी महिला कर्मचारी असल्यामुळे त्याचे मनसुबे उधळले गेले.

या प्रकारानंतर पोलिसांनी बाललैंगिलैं क अत्याचार कायद्यान्वये गुन्हा दाखल करून सदर कर्मचाऱ्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. तर शाळेनेही त्या कर्मचाऱ्यावर कारवाई करत त्याला बडतर्फ केलं आहे. या घटनेमुळे नंदुरबारमधील पालकांमध्ये आपल्या पाल्यांविषयी चिंता वाढल्याचं दिसतंय.
नंदुरबार शहरातील एका नामांकित शाळेत कंत्राटी सफाई कामगाराने पाचवीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीला आपल्या मोबाईलमध्ये आश्लील व्हिडीओ दाखवण्याचा खळबळजनक प्रकार उघड झाला आहे. सदर प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला.

शाळेमध्ये घडलेला हा प्रकार मुलीने तिच्या आई-वडिलांना सांगितला, त्यानंतर मुलीचे पालक नंदुरबार शहर पोलीस स्टेशनमध्ये गेले आणि तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणातला आरोपी हा 57 वर्षांचा असून मागच्या अनेक वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने सफाईचं काम करतो.

पोलिसांनी आरोपी सफाई कर्मचाऱ्याला अटक केली आहे, पण त्याच्या छातीत दुखायला लागल्यामुळे त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गुन्हा दाखल केला तर तुमची बदनामी होईल, असं शाळेच्या महिला मुख्याध्यापिका आणि चेअरमनने साांगितलं, त्यामुळे संपूर्ण घटनेची माहिती लपवण्याचा प्रयत्न केला म्हणून मुख्याध्यापिका आणि चेअरमनवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group