बदलापूर प्रकरण : चिमुकलीसोबत शाळेत काय घडलं? पालकांनी सांगितली मन सुन्न करणारी माहिती
बदलापूर प्रकरण : चिमुकलीसोबत शाळेत काय घडलं? पालकांनी सांगितली मन सुन्न करणारी माहिती
img
दैनिक भ्रमर
बदलापूर येथील नामांकित शाळेत दोन चिमुकलींसोबत लैंगिक अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. दरम्यान आरोपी नराधम अक्षय शिंदेला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी जोर धरु लागली. त्यासाठी आंदोलनही करण्यात आले . अशातच शाळेमध्ये नेमकं चिमुकलीसोबत काय घडलं आणि पालकांना या घटनेची माहिती कशी मिळाली.  याबाबद्दल धक्कादायक माहिती पालकांनी दिली आहे . 

चिमुकलीची आई म्हणाले की, 13 ऑगस्टचा दिवस होता, माझी मुलगी त्या दिवशी शाळेत गेली होती. त्यादिवशी पहिली मुलगी शाळेत गेली नव्हती. त्यानंतर मला कामावर असताना शाळेतून फोन आला. त्यांनी मला सांगितलं, तुमची मुलगी खूप रडतेय. ती रडायचं बिलकुल काही केल्या थांबत नाही आहे. तिला तुम्ही घरी घेऊन जा.  त्यानंतर मी माझ्या वडिलांना म्हणजे तिच्या आजोबांना फोन केला अन् सांगितलं की लेकीला शाळेतून घेऊन या. त्यानंतर माझे वडील तिला शाळेत घ्यायला गेले. नेहमी हसत खेळत एकटी येणारी त्यांची नात टीचरला पकडून रडतच बाहेर आली. 

तिने आजोबांचा हात धरला आणि ती वाकडी तिकडी चालत घराच्या दिशेने निघाली. त्या रात्री तिला पुन्हा ताप आला. आता मी घाबरली होती. सकाळी उठल्यावर 14 तारखेला तिला मी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली आणि तिला ताप आहे म्हणून दाखवलं. 

त्याच दिवशी माझ्या मुलीच्या मैत्रिणीच्या वडिलांनी माझ्या पतीला सांगितलं शाळेत त्यांच्या मुलीसोबत काय घडलं ते. माझे पतीने सांगितलं की, ती काही बोलत नसून तिला ताप आलाय. मग माझ्या पतीला संशय आला. कारण आमच्या मुलीलाही ताप होता, शाळेत जायला ती घाबरायची अन् झोपेत हातवारे करुन घाबरुन उठायची. 

आम्ही तिला 15 ऑगस्टला पुन्हा हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. तिथे महिला डॉक्टरला आम्ही शंका बोलून दाखवली. त्यांनी मुलीची संपूर्ण तपासणी केली. तेव्हा डॉक्टरने सांगितलं की, गुप्तांगात 1 सेंटीमीटरपर्यंत इजा झाली आहे. हे ऐकून आमच्या पायाखालची जमीन सरकली. कोणीतरी काहीतरी केल्याशिवाय हे होणार नाही. म्हणून तिला वारंवार ताप येत आहे. डॉक्टरांनी आम्हाला पोलिसांकडे जायला सांगितलं. 

तेव्हा आम्ही मुलीला विचारलं. तुला कुठे दुखतंय का? काही झालंय का तुला? तुला कोणी हात लावला का? त्या चिमुकलीने जे सांगितलं त्यानंतर....ती म्हणाली की, 'शाळेत एक दादा आहे. तो मला वॉशरुममध्ये घेऊन जातो मला हात लावतो. मला गुदूगुदू करतो आणि मारतो पण...'

त्यादिवशी घरात संताप अन् भयान शांतता होती, दुसऱ्या दिवशी 16 ऑगस्टला आम्ही मनसेच्या पदाधिकाऱ्यांना घेऊन दुपारी साडेबारा पोलीस स्टेशन गाठलं. तेव्हा तिथे शितोळे मॅडम होत्या, त्यांना सांगितलं की आम्हाला शाळेविरोधात तक्रार करायची आहे आणि शाळेतील प्रकाराबद्दल सांगितलं. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group