अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरण : अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर बदलापुरात काय घडलं?  वाचा
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरण : अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर बदलापुरात काय घडलं? वाचा
img
Dipali Ghadwaje
बदलापूरमध्ये दोन शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांनी एन्काउंटर केल्यानंतर बदलापुरमधील नागरिकांनी एकच जल्लोष केला. अक्षयच्या एन्काउंटरनंतर बदलापुरमध्ये महिलांनी एकमेकांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला. तर बदलापूर रेल्वे स्थानकावर बॅनर झळकावत जल्लोष करण्यात आला.

अक्षय शिंदेला अटक केल्यानंतर त्याला आमच्या ताब्यात द्या किंवा फाशी द्या अशी मागणी बदलापुरच्या नागरिकांनी केली होती. यासाठी त्यांनी रेलरोको आणि रास्तारोको आंदोलन देखील केलं होतं.

अक्षय शिंदेचा इन्काउंटर केल्यानंतर बदलापूरमध्ये ज्या शाळेत चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाले होते. त्याच शाळेबाहेर शिवसैनिकांनी जल्लोष केला. एकमेकांना पेढे भरवत, फटाके फोडत यावेळी शिवसेनेच्या महिला आणि पुरुष कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.

यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सरकारचे आभार मानले. बदलापुरात महिलांनी एकमेकांना पेढे वाटले आणि आनंद साजरा केला. यावेळी 'चिमुकल्यांना न्याय मिळाला, अक्षय शिंदे नरकात गेला' अशा घोषणा देण्यात आल्या.

तर अक्षय शिंदेच्या इन्काउंटरनंतर आज सकाळी बदलापूर रेल्वे स्थानकावर नागरिकांनी बॅनर्स झळकावले. 'नराधमाला शिक्षा मिळालीच', 'नराधम मेला आत्मा शांत झाला', 'एकनाथ...एक न्याय बलात्काराला थारा नाय 'अशा आशयाचे बॅनर झळकावण्यात आले.

दलापूर रेल्वे स्थाकावर देखील पेढे वाटत जल्लोष करण्यात आला. अखेर पीडित मुलींना न्याय मिळाला. यावेळी सर्वांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. दरम्यान, अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणानंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group