बदलापूर प्रकरण : अक्षय शिंदेच्या घरी तोडफोड करतांना गावकऱ्यांना घरात सापडली.....
बदलापूर प्रकरण : अक्षय शिंदेच्या घरी तोडफोड करतांना गावकऱ्यांना घरात सापडली.....
img
Dipali Ghadwaje
बदलापूर : बदलापूरच्या घटनेनंतर संपूर्ण राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, यासाठी अख्खं बदलापूर रस्त्यावर उतरलं होतं. अक्षय शिंदे याला 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. सध्या पोलिसांकडून अक्षय शिंदे याची कसून चौकशी सुरु झाली आहे.

अशातच बुधवारी बदलापूरमध्ये अक्षय शिंदे राहत असलेल्या खरवई गावातील ग्रामस्थ आक्रमक झाले. अक्षय शिंदे खरवईपासून काही अंतरावर असलेल्या एका चाळीत राहतो. ग्रामस्थांनी बुधवारी त्याच्या घरात शिरत कुटुंबीयांना बाहेर काढले आणि घरातील सामानाची तोडफोड केली. यानंतर गावकऱ्यांनी अक्षय शिंदे याच्या कुटुंबीयांना घरातून हुसकावून लावत गाव सोडण्यास भाग पाडले.

अक्षय शिंदेच्या घरात सापडली खेळणी

खरवईच्या ग्रामस्थांनी अक्षय शिंदे याच्या घरावर हल्ला चढवला तेव्हा त्याच्या घरात लहान मुलांची खेळणी सापडली. ही खेळणी नेमकी कुठून आली, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. याबाबत एसआयटी पथकाकडून तपास केला जाण्याची शक्यता आहे.  

 अक्षय शिंदे याचे कुटुंब मूळचे कर्नाटकातील गुलबर्गा या गावातील आहे. अक्षयचा जन्म खरवई गावात झाला होता. तो याठिकाणी असणाऱ्या एका चाळीत आपल्या कुटुंबीयांसोबत राहत होता. त्याच्या कुटुंबात आई-वडील आणि एक भाऊ असे तिघेजण आहेत. अक्षयच्या कृत्यामुळे राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. तो दहावीपर्यंत शिकला होता. यापूर्वी तो एका इमारतीचा सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. त्यानंतर 1 ऑगस्टपासून तो बदलापूरच्या शाळेत सफाई कर्मचारी म्हणून कामाला लागला होता. त्याने दोन चिमुरड्या मुलींना स्वच्छतागृहात नेऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला होता.

इतर बातम्या
Join Whatsapp Group