आताची मोठी बातमी !  हायकोर्टाच्या निर्णयानंतर  बंद बाबत शरद पवारांनी घेतला ''हा'' महत्वाचा निर्णय
आताची मोठी बातमी ! हायकोर्टाच्या निर्णयानंतर बंद बाबत शरद पवारांनी घेतला ''हा'' महत्वाचा निर्णय
img
दैनिक भ्रमर
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उद्या 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. बदलापुरात दोन चिमुकल्या मुलींवर घडलेल्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. पण त्यांच्या आवहनानंतर मुंबई हायकोर्टात या विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी तातडीने आज सुनावणीदेखील झाली. मुंबई हायकोर्टाने हा बंद बेकायदेशीर ठरवत राज्य सरकारला तसं झाल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना उद्देशून एक ट्विट केलं आहे. या ट्विटमधून शरद पवारांनी महाविकास आघाडीला उद्याचा बंद मागे घेण्याचं आवाहन केलं आहे. त्यामुळे उद्याचा महाराष्ट्र बंद कदाचित मागे घेतला जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान , “बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्या २४ ऑगस्ट २०२४ रोजी राज्यव्यापी सार्वजनिक बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्या दोन अजाण बालिकांवर झालेला अत्याचार हा अतिशय घृणास्पद होता. परिणामी समाजातील सर्व स्तरांतून याबाबतीत तीव्र लोकभावना उमटल्या. या बाबीकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न होता. हा बंद भारतीय राज्यघटनेच्या मुलभूत अधिकारांच्या कक्षेत होता. तथापि मुंबई उच्च न्यायालय यांनी सदर बंद घटनाबाह्य असल्याचा निर्वाळा दिला आहे. सदर निर्णयाविरूद्ध सर्वोच्च न्यायालयात तातडीने दाद मागणे वेळेच्या मर्यादेमुळे शक्य नाही. भारतीय न्यायव्यवस्था संविधानात्मक संस्था असल्याने संविधानाचा आदर राखून उद्याचा बंद मागे घ्यावा असे आवाहन करण्यात येते”, असं शरद पवार म्हणाले आहेत.
तसेच , महाराष्ट्रात अल्पवयीन मुली आणि महिलांवरील अत्याचार वाढत आहे. अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी गृह विभागाने सतर्क राहावे, अशी सूचना शरद पवार यांनी शुक्रवारी केली. 'बदलापूरच्या घटनेचा उल्लेख करताना पवार म्हणाले की, एका शाळेत असा गुन्हा घडणे धक्कादायक आहे. त्यानंतर बाहेर या कथित गुन्ह्यावर जनप्रतिक्रिया उमटल्या, असे त्यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले. अशा कृत्याविरोधात कडक कारवाई करण्याची गरज असून सर्वांनी तशी मागणी केली आहे.' बदलापूर अत्याचाराच्या घटनेनंतरही राज्यभरात अशाच प्रकारचे अनेक गुन्हे घडल्याचे पवार यांनी म्हटले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group