संतापजनक ! नराधमाकडून दहा वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार
संतापजनक ! नराधमाकडून दहा वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार
img
Dipali Ghadwaje
डोंबिवली : कोलकात्यात डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरण, बदलापुरातील चिमुकल्यांवरील अत्याचार प्रकरण दोन्ही घटनांनी देश पुरता हादरून गेला. अशातच बदलापूरची घटना ताजी असतानाच डोंबिवलीतील मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 

डोंबिवलीत एका दहा वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली. याप्रकरणी मनपाडा पोलिसांनी तातडीनं गुन्हा दाखल केला आहे.  डोंबिवली पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील एका गावातील दहा वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना काल दुपारच्या सुमारास घडली. 

याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी तातडीनं गुन्हा दाखल करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. अल्पवयीन मुलगी आरोपीच्या मुलांसोबत खेळत असताना, आरोपीनं मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

हेही वाचा >>>> जन्मदात्याकडून अल्पवयीन मुलीकडे शारीरिक सुखाची मागणी

नेमकं काय घडलं? 

डोंबिवलीतील मनपाडा पोलीस स्थानकाच्या हद्दीत राहणारी एक अल्पवयीन मुलगी आरोपीच्या मुलांसोबत खेळण्यासाठी गेली. त्यानंतर आरोपीनं मुलीवर अत्याचार केला. या घटनेनं डोंबिवलीतील मनपाडा पोलीस स्थानक हादरलं आहे. मानपाडा पोलिसांनी या घटनेची दखल घेत पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी धर्मेंद्र यादव या 32 वर्षीय आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकून कल्याण कोर्टात हजर केलं. कोर्टानं या घटनेची तातडीनं दखल घेतली आणि सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान सध्या देशभरात स्त्रियांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group